भारत आणि पाकिस्तान यांच्यात क्रिकेटच्या मैदानात पुन्हा एकदा महामुकाबला होणार आहे. कॉमनवेल्थ सामन्यामध्ये या दोन्ही टीम एकमेकांविरुद्ध महामुकाबला खेळणार आहेत. पाकिस्तानी क्रिकेट बोर्डने यासाठी मंगळवारी टीमची घोषणा केली आहे.
भारत आणि पाकिस्तानच्या महिला टीमचा सामना ३१ जुलैला होणार आहे. पाकिस्तान महिला टीमचं नेतृत्व बिस्माह मारूफ करणार आहे. बर्मिंघम, यूनाइटेड किंगडम येथे होणार्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारत आणि पाकिस्तान याच्यात सामना होणार आहे.
कॉमनवेल्थ गेम्सआधी ट्राय सीरिज होणार आहे, ज्यामध्ये पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया आणि आयर्लंडच्या महिला टीम सहभागी होणार आहेत. पाकिस्तानची टीम १६ ते २४ जुलैपर्यंत बेलफास्टमध्ये टी२० वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलिया आणि आयर्लंडविरुद्ध खेळेल.
कॉमनवेल्थ गेम्समध्ये यानंतर पाकिस्तानचा पहिला सामना २९ जुलैला बार्बाडोसविरुद्ध, ३१ जुलैला भारताविरुद्ध आणि ३ ऑगस्टला ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे. १२ जुलैला पाकिस्तानची टीम युकेला रवाना देखील होणार आहे. पाकिस्तान संघात दोन्ही सीरिजसाठी १८ खेळाडूंची घोषणा करण्यात आली आहे.
कॉमनवेल्थ स्पर्धा २९ जुलै ते ३ ऑगस्ट या कालावधीत होणार आहे. कॉमनवेल्थ स्पर्धेमुळे क्रिकेट चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात क्रिकेटच्या मैदानावर सामना पहायला मिळणार आहे.
पाकिस्तान महिला क्रिकेट टीम पुढीलप्रमाणे आहे. ज्यामध्ये तीन राखीव खेळाडूंसह १८ खेळाडूंची निवड केली आहे.पाकिस्तान महिला टीमचं नेतृत्व बिस्माह मारूफ करणार आहे. बिस्माह मारूफ, एमेन अनवर, आलिया रियाज, अनम अमीन, आयशा नसीम, डायना बेग, फातिमा सना, गुल फिरोजा, इरम जावेद, कायनात इम्तियाज, मुनीबा अली सिद्दीकी, निदा डार, ओमैमा सोहेल, सादिया इकबाल और तुबा हसन.
महत्वाच्या बातम्या:-
सासरच्या त्रासाला कंटाळून आली माहेरी, UPSC पास करत देशात पटकावला १७७ वा क्रमांक
IAS झाला म्हणून पुर्ण गावात वाटले पेढे, पण सत्य समोर आल्यानंतर आला हार्ट अटॅक, तुटले स्वप्न
जॉनी डेपने जिंकला मानहानीचा खटला, अंबर हर्डला द्यावी लागणार ‘इतक्या’ कोटींची नुकसान भरपाई