india lost match against england | टी २० वर्ल्डकप २०२२ चा दुसरा सेमी फायनल सामना भारत आणि इंग्लंड यांच्यात ऍडलेडच्या मैदानावर खेळला गेला. या सामन्यात टीम इंडियाने नाणेफेक गमावून सुरुवात केली आणि सामना गमावून संपला. इंग्लंडविरुद्ध टीम इंडियाची गोलंदाजी पूर्णपणे फ्लॉप ठरली, त्यामुळे भारताला पराभवाचा सामना करावा लागला.
या पराभवासह टीम इंडिया २०२२ च्या टी २० वर्ल्डकप बाहेर पडली आहे. हा सामना जिंकण्यासाठी इंग्लंड संघाला २० षटकात १६९ धावा करायच्या होत्या. इंग्लंड संघाने एकही विकेट न गमावता हे लक्ष्य गाठले आहे. जोस बटलरने नाबाद ८० आणि अॅलेक्स हेल्सने नाबाद ८६ धावा केल्या.
आता टी-२० विश्वचषक २०२२ चा अंतिम सामना आता इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात होणार आहे. या सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर टीम इंडियाने प्रथम फलंदाजी केली, मात्र संघाची सुरुवात खराब झाली. सामन्यात केएल राहुल ५ धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला.
राहूल ख्रिस वोक्सने दुसऱ्या षटकाच्या अतिरिक्त बाऊन्ससमोर खराब शॉट खेळून बाद झाला. पहिल्या दहा षटकात केवळ ६२ धावा झाल्या. तेव्हा रोहित शर्मा आणि विराट कोहली क्रिझवर होते. दोघांनाही मोठे शॉट्स खेळता आले नाही. अशातच रोहित बाद झाला.
हार्दिक पांड्याने फिनिशरची भूमिका बजावत ३३ चेंडूत ६३ धावा करून भारताला इंग्लंडविरुद्धच्या टी-२० वर्ल्डकपच्या सेमी फायनलमध्ये ६ बाद १६८ धावा करता आल्या. त्याचवेळी विराट कोहलीने ४० चेंडूत ५० धावा केल्या. असे असले तरी भारतीय संघाच्या गोलंदाजांना चांगली कामगिरी करता आली नाही आणि भारतीय संघाने हा सामना गमावला आहे.
महत्वाच्या बातम्या-
rohit sharma : तु आता रिटायर्ड हो..; रोहीत शर्माच्या कासवछाप इनिंगमुळे चाहते भडकले
अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी! सानिया मिर्झा अन् शोएब मलिकचा घटस्फोट
uddhav thackeray : जामीनानंतर उद्धव ठाकरेंचा संजय राऊतांना थेट फोन म्हणाले, संजय…






