india lost first ind vs sa odi | दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघांचा पराभव झाला आहे. गोलंदाजीसोबतच फलंदाजीतही संघ फ्लॉप ठरला. नाणेफेक हरल्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या पाहुण्या संघाला चांगला निकाल देता आला नाही. खराब सुरुवातीमुळे संघाने यजमानांसमोर २५० धावांचे लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तरात भारतीय संघाला दिलेले लक्ष्य गाठण्यात अपयश आले. ९ धावांनी भारताने हा सामना गमावला आहे.
प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेच्या संघाला चांगली सुरुवात करता आली नाही, मात्र संघाच्या डेव्हिड मिलर आणि हेनरिक क्लासेन यांनी अप्रतिम कामगिरी दाखवली. येनेमन मलानने डावाची सुरुवात करताना २२ धावा केल्या, तर दुसरा सलामीवीर क्विंटन डी कॉक ४८ धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याचवेळी या सामन्यात कर्णधार टेंबा बावुमाची बॅटही शांत दिसत होती आणि त्याने फक्त ८ धावा केल्या.
एडन मार्कराम हा एकमेव फलंदाज होता जो संघासाठी एकही धाव काढू शकला नाही. एकीकडे संघाचे सर्व फलंदाज चांगली कामगिरी दाखवण्यात अपयशी ठरले असताना, दुसरीकडे मिलर आणि हेनरिक या जोडीने भारतीय गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. हेनरिक आणि मिलर यांनी संघासाठी नाबाद खेळी खेळताना अनुक्रमे ७४ आणि ७५ धावांची खेळी केली. या दोघांच्या फटकेबाजीच्या जोरावरच संघाला २४९ धावा करता आल्या.
भारतीय संघ पुन्हा एकदा गोलंदाजीत फ्लॉप ठरला. शार्दुल ठाकूरशिवाय संघाचे गोलंदाज आपले गोलंदाजी कौशल्य दाखवण्यात पूर्णपणे अपयशी ठरले. त्याचवेळी भारताकडून एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा रवी बिश्नोईलाई चांगली कामगिरी करता आली नाही.
संघाच्या या युवा गोलंदाजाने ६९ धावा दिल्या. यादरम्यान त्याचा इकॉनॉमी रेट ८.६२ होता. मोहम्मद सिराज आणि आवेश खान हे गोलंदाज होते ज्यांनी एकही विकेट घेतली नाही. शार्दुलने ८ षटकात मेडन षटक टाकले आणि ३५ धावा देत दोन विकेट्स घेतल्या. कुलदीप यादवने एक विकेट आपल्या नावावर नोंदवली.
प्रत्युत्तरात भारतीय संघाची सुरुवातही चांगली झाली नाही. संघाची सलामीची जोडी छोटे डाव खेळून बाद झाली. सलामीवीर शिखर धवनने ४१ धावा आणि शुभमन गिलने ३१ धावा केल्या. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणारा ऋतुराज गायकवाड १९ धावांची खेळी खेळून पॅव्हेलियनमध्ये परतला. इशान किशनने ३७ चेंडूत २० धावा केल्या, तर श्रेयस अय्यरने अर्धशतक झळकावताना ५० धावांचे योगदान दिले.
दुसरीकडे, संजू सॅमसन संघासाठी शानदार खेळी केली. त्याने ८६ धावा केल्या, पण भारतीय संघाला यश मिळवता आले नाही. गोलंदाजीत अप्रतिम असलेला शार्दूल ठाकूर ३३ धावांची इनिंग खेळून बाद झाला. इतर कोणत्याही खेळाडूला चांगली कामगिरी करता आली नाही. त्यामुळे भारताला हा सामना गमवावा लागला.
महत्वाच्या बातम्या-
IND Vs SA : शेवटच्या चेंडूपर्यंत लढणाऱ्या सॅमसनची झुंज ठरली अपयशी; श्वास रोखून धरणाऱ्या सामन्यात भारत पराभूत
Dasara melava : मुंबईत यात्रेला जात असल्याचं सांगून अमराठी कामगारांना शिंदेंच्या मेळाव्याला आणलं? धक्कादायक खुलासा आला समोर
Air Force: हवाई दलाच्या जवानाने स्टॅम्प पेपरवर लिहिली भावनिक सुसाईड नोट, वाचून आई मृतदेहापाशी ढसाढसा रडली