Share

india : टिम इंडीयाची पुन्हा लाज निघाली; दुबळ्या बांगलदेशविरूद्ध गमावला हातातला सामना

ind vs ban

india lose match againsta bangladesh  | रविवारी शेरे बांगला स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या पहिल्या वनडे सामन्यात टीम इंडियाला बांगलादेशकडून १ गडी राखून पराभव स्वीकारावा लागला आहे. हा सामना जिंकून बांगलादेशने तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. या रोमांचक सामन्यात प्रथम फलंदाजी करताना टीम इंडिया ४१.२ षटकात १८६ धावा केल्या होत्या आणि बांगलादेशला विजयासाठी १८७ धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात बांगलादेश संघाने ४६ षटकांत १८७ धावा करत सामना जिंकला.

आता भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसरा वनडे सामना बुधवार, ७ डिसेंबर रोजी सकाळी ११.३० वाजल्यापासून खेळवला जाईल. बांगलादेशने पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताला १८६ धावांत गुंडाळले. या सामन्यात भारताकडून लोकेश राहुलने खेळलेल्या (७३) अर्धशतकीय खेळीमुळेच भारताला १८६ धावांचा स्कोर उभा करता आला.

राहुलने ७० चेंडूत पाच चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने ७३ धावांची खेळी केली. पण भारताच्या इतर फलंदाजांना धावा करता आल्या नाही. कर्णधार रोहित शर्मा (२७) आणि श्रेयस अय्यर (२४) यांनाच २० धावांचा टप्पा ओलांडता आला. शाकिबशिवाय इबादत हुसेननेही ४७ धावांत चार बळी घेतले, त्यामुळे संपूर्ण भारतीय संघ ४१.२ षटकार तंबुत परतला.

नाणेफेक जिंकून बांगलादेशने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, त्यानंतर मुस्तफिझूर रहमानने पहिले षटक मेडन टाकले. रोहितने हसन महमूदवर चौकार मारून भारताचे चौकार खाते उघडले. बांगलादेशचा कर्णधार लिटन दासने चौथ्या षटकातच चेंडू फिरकीपटूंकडे सोपवला.

ऑफस्पिनर मेहदी हसन मिराजने सलामीवीर शिखर धवनला (७) बोल्ड करून चांगली सुरुवात केली. मेहदी हसनचा चेंडू रिव्हर्स स्वीप करण्याच्या प्रयत्नात धवन बाद झाला. त्यानंतर रोहित आणि विराट कोहली सुद्धा लवकर बाद झाले. यानंतर राहुल आणि श्रेयसने डाव सावरण्याचा प्रयत्न केला.

अशात इबादतने श्रेयस अय्यरला झेलबाद केले. त्यानंतर राहुलने वॉशिंग्टन सुंदर (१९) सोबत ६० धावांची भागीदारी केली. राहुलचे अर्धशतक पूर्ण केल्यानंतर शकीबच्या चेंडूवर रिव्हर्स स्वीप खेळण्याच्या प्रयत्नात वॉशिंग्टनने इबादतकडे झेल दिला. त्यानंतर कोणत्याच खेळाडूला चांगली कामगिरी करता आली नाही. चांगला स्कोर उभा करता न आल्यामुळे बांगलादेशने हा सामना जिंकला आहे.

राहूलमुळे भारतीय संघाने हा सामना गमावल्याचे म्हटले जात आहे. भारतीय संघाने ९ विकेट्स घेतल्या होत्या. अशात बांगलादेशला ४८ चेंडूत ३२ धावांची गरज होती. पण १ विकेट पडली तर बांगलादेशने हा सामना गमावला असता. अशात शार्दूल ठाकूर गोलंदाजी करत होता. त्यावेळी मेहदीने एक शॉट हवेत खेळला. झेल खुप साधा होता. पण राहूलकडून तो झेल सुटला. राहूलने जर तो झेल पकडला असता तर भारतीय संघाने सामना जिंकला असता. राहूलने झेल सोडल्यामुळे रोहितही खुप संतापलेला दिसला. रोहित त्याला शिवीगाळही करताना दिसला.

महत्वाच्या बातम्या-
virat kohli : ३४ व्या वर्षी सुद्धा जबरदस्त फिट आहे विराट, ३ सेकंद हवेत राहून घेतला सुपरमॅन कॅच; पहा व्हिडिओ
udayanraje bhosle : उदयनराजे भाजप सोडत खासदारकीवरही लाथ मारणार? रायगडावरून केली मोठी घोषणा
Vivek Agnihotri House : कश्मीर फाईल्समधून कमावला तुफान पैसा, दिग्दर्शक अग्निहोत्रींने घेतले करोडो रूपयांचे आलिशान घर; पहा फोटो..

ताज्या बातम्या खेळ

Join WhatsApp

Join Now