क्रिकेटच्या कोणत्याही फॉरमॅटमध्ये षटकातील सर्व ६ चेंडूत ६ षटकार मारणे सोपे नाही. आतापर्यंत मोजक्याच फलंदाजांना अशी कामगिरी करता आली आहे. या मोजक्या फलंदाजामध्ये आता आणखी एका खेळाडूचे नाव समावेश झाले आहे. त्याची सध्या क्रिकेट क्षेत्रात चर्चा होत आहे.
२००७ मध्ये टी-२० वर्ल्ड कपमध्ये भारताच्या युवराज सिंगने ६ चेंडूत ६ षटकार मारून पराक्रम केला होता. गेल्या वर्षी श्रीलंकेविरुद्ध किरॉन पोलार्डने षटकातील सर्व चेंडूंवर षटकार ठोकले होते. आता आणखी एका खेळाडूने असेच केले आहे. T10 लीगमध्ये भारतीय फलंदाजाने ६चेंडूत ६ षटकार मारून खळबळ उडवून दिली आहे.
पुद्दुचेरी T10 लीगमध्ये देशभक्त संघाकडून खेळताना कृष्णा पांडे नावाच्या फलंदाजाने हा पराक्रम केला आहे. मात्र एवढ्या चांगल्या पराक्रमानंतर देखील त्याची टीम विजयी होऊ शकली नाही. सहाव्या षटकात चेंडू वेगवान गोलंदाज नितीन ठाकूरच्या हातात होता. पंड्याने पहिल्या चेंडूवर मिड विकेट, दुसऱ्या चेंडूवर लाँग ऑन मारला.
तसेच तिसऱ्या चेंडूवर लाँग ऑफ, चौथ्या चेंडूवर स्क्वेअर लेग, पाचव्या चेंडूवर मिड विकेट आणि शेवटच्या चेंडूवर थर्ड मॅनवर षटकार मारला. शेवटचा चेंडू त्याच्या बॅटमधून नीट आला नाही, पण बाहेरची किनार घेऊनही तो सीमारेषेच्या बाहेर गेला.
6️⃣6️⃣6️⃣6️⃣6️⃣6️⃣
He has done the unthinkable! #KrishnaPandey shows what's possible with his heart-stirring hits!
Watch the Pondicherry T10 Highlights, exclusively on #FanCode 👉 https://t.co/GMKvSZqfrR pic.twitter.com/jfafcU8qRW
— FanCode (@FanCode) June 4, 2022
पॅट्रियट्सविरुद्ध रॉयल्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पुद्दुचेरी क्रिकेट असोसिएशन पुद्दुचेरी सीचेम मैदानावर हा सामना झाला. रॉयल्सने १० षटकांत ३ बाद १७५ धावा केल्या. सलामीवीर आर रघुपतीने ३० चेंडूत ८४ धावांची तुफानी खेळी केली. प्रत्युत्तरात पॅट्रियट्सने पाचव्या षटकात तीन गडी गमावले.
त्यानंतर कृष्णा पांडेने १९ चेंडूत ८३ धावांची अविश्वसनीय खेळी खेळली. त्याच्या खेळीत १२ षटकार आणि २ चौकारांचा समावेश होता. अखेर तो बाद झाला आणि पॅट्रियट्सचा सामना अवघ्या चार धावांनी गमवावा लागला. पराभवानंतरही, पॅट्रियट्स १२ सामन्यांतून ८ विजयांसह गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. त्याच वेळी, रॉयल्स आता पॉइंट टेबलमध्ये सातव्या स्थानावर आहे.