भारतातून अनेक देशांना चहाची निर्यात होत असते. मात्र आता भारतीय चहाच्या अनेक खेपा आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत खरेदीकरांनी माघारी पाठवल्या आहेत. कीटकनाशके आणि रसायनांचा वापर अधिक असल्याचे कारण देत त्यांनी या चहाच्या खेपा माघारी पाठवल्या आहेत. ही माहिती इंडियन टी एक्सपोर्ट असोसिएशन अध्यक्ष अंशुमन कनोरिटा यांनी दिली आहे.
नुकतेच तुर्की या देशाने भारतीय गहू भारताला परत केला होता. पाठवण्यात आलेल्या गव्हात रुबेला विषाणू आहे, यामुळे तुर्कस्तानने फायटोसॅनिटरीच्या चिंतेमुळे भारतीय गव्हाची खेप नाकारली. त्यानंतर आता गहू पाठोपाठ इतर देशात पाठवण्यात आलेला चहा देखील माघारी पाठवला गेला आहे.
भारतीय चहा निर्यातदार संघाचे अध्यक्ष अंशुमान कनोरिया यांनी सांगितले, की आंतरराष्ट्रीय आणि देशातील खरेदीदारांनी किटनाशके आणि रसायने निश्चित केलेल्या प्रमाणापेक्षा अधिक असल्याने चहाच्या बॅचस् ची एक मालिका परत केली आहे.
जागतिक चहा बाजारात श्रीलंकेची स्थिती अस्थिर झाल्याने भारतीय चहा मंडळ निर्यात वाढवण्यावर विचार करित आहे. मात्र बॅचस् परत केल्याने बाहेरील शिपमेंटमध्ये घसरण होत आहे. तथापि चहाची खेप नाकारणे आणि परत केल्यामुळे परदेशातून चहा पाठवण्याचे प्रमाण कमी होत आहे.
देशात विकल्या गेलेल्या सर्व चहाने भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरण नियमांचे पालन केले पाहिजे. परंतु कनोरिया यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, बहुतेक खरेदीदार चहाची खरेदी करत आहेत त्यात रासायनिक सामग्रीचे प्रमाण जास्त आहे.
माहितीनुसार,२०२१ मध्ये भारताने १९५.९ दशलक्ष टन चहा निर्यात केली. कॉमनवेल्थ ऑफ इंडिपेंडेंट स्टेटसआणि इराण भारताकडून सर्वाधिक चहा खरेदी करतात. भारतीय चहा मंडळाने यावर्षी ३०० दशलक्ष टन चहानिर्यात करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. मात्र आता या घटनेमुळे भारताला आर्थिक नुकसान झाले आहे.