Share

ह्रदयाची धडधड वाढवणाऱ्या सामन्यात भारत अखेरच्या षटकात पराभूत, पाकीस्तान विश्वचषकाच्या बाहेर

टी -20 विश्वचषक 2022 मधील सुपर -12 मध्ये आज आणखी एक श्वास रोखून धरणारा सामना झाला. या लो स्कोअर सामन्याने प्रेक्षकांना थरारक लढत पाहायची संधी  दिली. पण या थरराक सामन्यात भारताचा पराभव करत दक्षिण आफ्रीकेने धडाकेबाज विजय मिळवला. सोबतच भारताच्या पराभवाने पाकीस्तान  टी -20 विश्वचषकातून जवळपास बाहेर पडला आहे.

टॉस जिंकल्यानंतर इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सगळे फलंदाज अपयशी ठरल्यानंतर सूर्यकुमार यादवच्या -64 धावांच्या जीवावर टीम इंडियाने 133 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेचा डावही सुरुवातीच्या टप्प्यात अडखळला. पण त्यानंतर ॲडन मार्क्रमने चमकदार फलंदाजी सादर करत आपल्या संघाच्या विजयात महत्वाती भूमिका बजावली. 5 विकेट राखून दक्षिण आफ्रिकेने भारताचा पराभव केला.

टॉस जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाची खूप वाईट सुरुवात झाली. पहिलो षटक वेन पार्नेलने निर्धाव टाकले. त्यानंतर, एनगीडीने के एल राहूल, रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना बाद करत चार बळी घेतले.

यानंतर, टीम इंडियाने पहिला विश्वचषक सामना खेळत  असलेल्या दिपक हुडाला फलंदाजीसाठी पाठवले पण तोही काहीही करामत करू शकला नाही. हार्दिक पांड्याही लवकर बाद झाला. एक काळ असा होता की टीम इंडियाने त्यांच्या 5 फलंदाजांना फक्त 49 धावांवर गमावले होते.

सूर्यकुमार यादव एकटाच लढत होता. त्याच्यामुळेच टीम इंडिया 133 चा पल्ला गाठू शकली. दबावाच्या परिस्थितीत, सूर्यकुमार यादवने आणि दिनेश कार्तिकने 52 धावांची चांगली भागीदारी रचली. सूर्यकुमार यादवने 40 चेंडूंचा सामना केला. त्याने 6 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 68 धावा केल्या. त्यामुळेच  भारताचा स्कोअर 133 पर्यंत पोहोचला.

त्याच वेळी, 134 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेलाही मोठा धक्का बसला. पहिल्या षटकात फास्ट गोलंदाज अर्शदीप सिंगने क्विंटन डिकॉक (1) आणि रिले रुसो (0) यांना बाद केले. यानंतर, दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बावुमा (10) देखील बाद झाला.

पण नंतर  डेव्हिड मिलर आणि ॲडन मार्क्रम यांनी आफ्रीकेचा डाव सावरला. या दोन्ही फलंदाजांनी आपले अर्धशतक पूर्ण केले. तसेच चौथ्या विकेटसाठी 76 धावांची भागीदारी केली. ज्यामुळे दक्षिण आफ्रिके पुन्हा मजबूत स्थितीत आली.

पुन्हा भारतीय गोलंदाजांनी ट्रिस्टन स्टॅब्स आणि ॲडन मार्क्रमला बाद केले. पण डेविड मिलरने आपल्या धडाकेबाज फलंदाजीने शेवटच्या षटकात आवश्यक असलेल्या ६ धावा फक्त ३ चेंडूत बनवत संघाला विजयी केले.

ताज्या बातम्या खेळ

Join WhatsApp

Join Now