ind vs pak match weather | टी २० वर्ल्डकप २०२२ मध्ये आज महामुकाबला पाहायला मिळणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात टी-२० वर्ल्डकपचा सामना रंगणार आहे. हा सामना मेलबर्न क्रिकेट ग्राउंड येथे भारतीय वेळेनुसार दुपारी १.३० वाजता खेळवला जाणार आहे. मात्र तिथे काही दिवसांपासून पावसाचा धोका निर्माण झाला आहे.
ब्रिस्बेनमधील काही सराव सामनेही पावसामुळे अजिबात होऊ शकले नाहीत. तर होबार्टमध्ये खेळल्या गेलेल्या पात्रता सामन्यांनाही पावसाचा फटका बसला. मेलबर्नमध्येही काही दिवसांपासून पाऊस पडत आहे. मात्र आज (२३ ऑक्टोबर) बद्दल बोलायचे झाले तर, गेल्या २४ तासांपासून येथे पाऊस पडला नाही.
तिथे सध्या ढगाळ वातावरण असले तरी दुपारच्या सामन्यादरम्यान पावसाची शक्यता आहे. पण हा पाऊस इतका जोरात नसेल की त्यामुळे सामना थांबवला जाईल. पण या थोड्याशा पावसाचाही सामन्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे हा सामना होणार की नाही हे तर त्यावळचे वातावरणच ठरवेल.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी मेलबर्नमध्ये पावसाची शक्यता ४० टक्क्यांपर्यंत असेल. आकाश ९२ टक्के ढगाळ असणार आहे. तर वाऱ्यांचा वेगही ४५ किमी/तास राहील. रविवारी मेलबर्नमध्ये कमाल तापमान २१ अंश सेल्सिअस राहील, तर किमान तापमान १५ अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे.
दरम्यान, यावेळी टी-२० वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाला सुपर-१२ च्या ग्रुप-बीमध्ये ठेवण्यात आले आहे. या गटात टीम इंडियाशिवाय पाकिस्तान, बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिका देखील आहेत. तर नेदरलँड्स आणि झिम्बाब्वे या दोन संघांनी पात्रता फेरीनंतर या गटात प्रवेश केला आहे.
टी २० विश्वचषकासाठी भारत-पाकिस्तान पूर्ण संघ: रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुड्डा, ऋषभ पंत (विकेट किपर), दिनेश कार्तिक (विकेट किपर), हार्दिक पांड्या, आर.के. अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी. स्टँडबाय खेळाडू: श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर.
पाकिस्तान संघ : बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, आसिफ अली, हैदर अली, हरिस रौफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद हसनैन, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, मोहम्मद वसीम जूनियर, नसीम शाह, शाहीन शाह आफ्रिदी, शान मसूद , फखर जमान. स्टँडबाय खेळाडू: मोहम्मद हरीस, उस्मान कादिर आणि शाहनवाज दहनी.
महत्वाच्या बातम्या-
Anand Mahindra : घरावर ‘हे’ मशीन बसवताच विजबील येईल शुन्य; आनंद महिंद्राही मशीन पाहून झाले भलतेच खुश, म्हणाले…
BJP : बड्या नेत्याचा भाजपला घरचा आहेर, म्हणाला, २०२४ ला भाजपला महाराष्ट्रात पराभवाला सामोरे जावे लागेल
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांचे हिंदुत्वच खरे आहे; मुस्लिम सेवा संघाचा ठाकरेंना जाहीर पाठिंबा