ind vs pak match axar patel run out | टी २० वर्ल्डकपमधला पाकिस्तानविरुद्धचा सामना भारतीय संघाने जिंकला आहे. भारताने हा सामना ४ विकेट्स जिंकला असला तरी सामन्यातील प्रत्येक क्षणी थरार पाहायला मिळाला. भारत-पाकिस्तान यांच्यातील टी २० वर्ल्डकपच्या हाय व्होल्टेज सामन्यात प्रत्येक क्षणी प्रेक्षकांच्या मनात धडकी भरत होती.
१६० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाचे ४ फलंदाज अवघ्या ३१ धावांत बाद झाले. यावरून अक्षर पटेलच्या रनआउटवर चांगलाच गदारोळ झाला. खरे तर असे घडले की सातव्या षटकाचा पहिला चेंडू शादाब खान टाकायला आला होता.
शादाब चेंडू टाकत असताना अक्षर मिडविकेटवर खेळण्याचा प्रयत्न केला. यानंतर अक्षर क्रीजवरून धावला, पण बाबर आझमच्या क्षेत्ररक्षणाचा अंदाज घेत दुसऱ्या टोकाला उभ्या असलेल्या विराट कोहलीने त्याला माघारी पाठवले. अक्षर क्रीजवर येण्यापूर्वी बाबरने चेंडू रिझवानकडे चेंडू फेकला आणि त्याने बेल्स उडवले.
https://twitter.com/grassrootscric/status/1584132787644178432?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1584132787644178432%7Ctwgr%5E0d5e62815c4ab2b993cf50e31d0fff31e261ee34%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fhindi.news24online.com%2Fsports%2Fcricket%2Find-vs-pak-axar-patel-was-not-out-mohammad-rizwan-runout-created-controversy%2F71246%2F
तिथूनच रनआऊटच्या वादाला सुरुवात झाली. रनआउटचा हा निर्णय थर्ड अंपायरकडे पाठवण्यात आला होता. रिझवानच्या हातातून चेंडू निसटल्याचे रिप्लेमध्ये दिसून आले, त्याने आपल्या हातांनी स्टंप उडवल्याचे दिसून येत होते. त्याच्या हातात चेंडू नसल्याचे स्पष्ट दिसत होते.
https://twitter.com/CricSubhayan/status/1584133740334579713?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1584133740334579713%7Ctwgr%5E0d5e62815c4ab2b993cf50e31d0fff31e261ee34%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fhindi.news24online.com%2Fsports%2Fcricket%2Find-vs-pak-axar-patel-was-not-out-mohammad-rizwan-runout-created-controversy%2F71246%2F
बाद नसतानाही बाद दिल्यामुळे सगळेच हैराण झाले. पण थर्ड अंपायरच्या निर्णयामुळे अक्षर पटेलला तंबुत परतावे लागले. या निर्णयावर मात्र अनेकजण संताप व्यक्त करताना दिसून आले. हातात चेंडू नसतानाही थर्ड अंपारयने बाद दिल्याचे अनेकांनी म्हटले आहे.
अशात काही क्रिकेट चाहत्यांनी सांगितले की, रिझवानने बेल्स उडवले तेव्हा चेंडू त्याच्या हातात होता, त्यामुळेच थर्ड अंपायरने अक्षरला बाद घोषित केले. यावेळी अक्षरने फक्त २ धावा केल्या होत्या. पण त्यानंतर विराट कोहली आणि हार्दिक पांड्याने जबरदस्त खेळी खेळत संघाला विजय मिळवून दिला.
महत्वाच्या बातम्या-
Love Story : याला म्हणतात खरं प्रेम! पतीचा त्रास बघवत नव्हता, तर पत्नीने चक्क आपल्या पतीला केली किडनी दान
virat kohli : …अन् पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमही झाला विराटसमोर नतमस्तक; वाचा काल रात्री काय घडलं?
T20 World Cup : विराटच्या वादळात पाकीस्तान उद्धवस्त; शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेल्या सामन्यात थरारक विजय