Share

IND Vs PAK : हाय व्होल्टेज ड्रामा! २ धावबाद, नो बॉल, फ्री हिट शेवटच्या ओव्हरमध्ये वाढली होती धाकधूक, वाचा काय घडलं

ind vs pak

ind vs pak macth last over | टी २० विश्वचषक २०२२ च्या पहिल्या सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानविरुद्धचा सामना जिंकला आहे. सामन्यात कधी पाकिस्तान तर कधी भारत जिंकेल असे वाटत होते. शेवटी आर अश्विनच्या शॉटने भारताला शानदार विजय मिळवून दिला. या संपूर्ण सामन्यात भारतीय डावातील शेवटचे षटक अतिशय रोमांचक होते.

नो बॉल, फ्री हिट आणि दोन रन आऊट असलेल्या या षटकाने सर्वांनाच हैराण करून टाकले होते.शेवटच्या षटकात भारताला विजयासाठी १६ धावांची गरज होती आणि मोहम्मद नवाज पाकिस्तानकडून गोलंदाजी करण्यासाठी आला. पण अखेरच्या षटकात १६ धावा करणेही भारतासाठी कठीण होते.

अखेरच्या ओव्हरमध्ये दोन विकेट पडल्यानंतरही टीम इंडियाने सामना जिंकला. मोहम्मद नवाजचे शेवटचे ओव्हर पाहण्यासारखे होते कारण फिनिशर म्हणून ओळख असणारे हार्दिक पांड्या आणि दिनेश कार्तिक याच ओव्हरमध्ये बाद झाले होते.

षटकाच्या पहिल्याच चेंडूवर हार्दिक पांड्या बाद झाला. पांड्याची विकेट पडल्यानंतर भारत दडपणाखाली आला. पांड्या बाद झाल्यानंतर दिनेश कार्तिक फलंदाजीला आला. षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर १ धाव आली. दिनेश कार्तिकने ही धाव घेतली. यानंतर षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर विराट कोहली २ धावांसाठी धावला.

ओव्हरचा चौथा चेंडू नो बॉल होता आणि त्यावर कोहलीने शानदार सिक्सर मारला. पुढचा चेंडू फ्री हिट होता. – पुढच्या चेंडूवर नवाजने वाईड गोलंदाजी केली. – फ्री हिट अजूनही शाबूत होता. या चेंडूवर कोहली चुकला आणि स्टंपवर गेला आणि त्यानंतर मागे गेला.

चेंडू जेव्हा मागे गेला तेव्हा कोहलीने धावला आणि त्याने ३ धावा काढल्या. त्यानंतर दिनेश कार्तिक धावबाद झाला. त्यामुळे फलंदाजीला आलेल्या अश्विनला प्रथम नवाजने वाईड चेंडू टाकला आणि शेवटच्या चेंडूवर अश्विनने फटकेबाजी करत भारतीय संघाला विजय मिळवून दिला.

महत्वाच्या बातम्या-
ratlam : ‘या’ देवीच्या मंदिरात भाविक करतात करोडोंची संपत्ती दान, पण दिवाळीनंतर मिळते परत; ४०० वर्षांचा आहे इतिहास
Shivsena : “फडणवीसांच्या ‘त्या’ निर्णयामुळे मुख्यमंत्री नाराज, शिंदे गटातील २२ आमदारही भाजपात विलीन होणार”
विराटने पाकिस्तानच्या जबड्यातून हिरावला विजयाचा घास; एका वर्षाने भारताने घेतला बदला, तोही व्याजासह

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now