Share

IND Vs NED : भारताचा विजयरथ थांबेना! टी २० वर्ल्डकपमध्ये ५६ धावांनी जिंकला नेदरलँड्सविरुद्धचा सामना

indian team

ind vs ned match won india |  भारतीय क्रिकेट संघाने टी २० वर्ल्डकप २०२२ मधील सुपर-१२ टप्प्यातील दुसऱ्या सामन्यात पुन्हा एकदा विजय मिळवला आहे. दुसऱ्या सामन्यात भारताने नेदरलँड्सचा एकतर्फी पराभव केला. सिडनी क्रिकेट मैदानावर खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.

जिथे रोहितने स्वतः शानदार अर्धशतक झळकावले. तसेच विराट कोहली-सूर्यकुमार यादव या जोडीनेही आपापले अर्धशतक पूर्ण केले आणि टीम इंडियाला १७९ धावांपर्यंत नेले. त्यामुळे नेदरलँड्सच्या संघाला विजयासाठी १८० धावांचे मोठे लक्ष्य मिळाले. त्याचा पाठलाग करताना संघ केवळ १२३ धावांवर करता आल्या.

भारताने ५६ धावांनी हा सामना जिंकला आहे. नेदरलँड्ससाठी १८० धावांचे लक्ष्य साहजिकच आव्हानात्मक ठरणार होते. दुसरीकडे, टीम इंडियाच्या गोलंदाजांनी ते अधिक कठीण केले. अगदी सुरुवातीलाच नेदरलँडच्या संघाला अवघ्या ११ धावांवर बसला. जिथे विक्रमजीत सिंगने आपली विकेट गमावली.

त्यानंतर मॅक्स ओ’डॉडही अवघ्या ९ धावांवर बाद झाला. बास डी लीडे आणि कॉलिन अकरमन यांनी तिसऱ्या विकेटसाठी २७ धावांची भागीदारी केली. पण त्यानंतर ४७ धावांवर विकेट पडल्यांनंतर एकामागोमाग विकेट पडण्यास सुरुवात झाली.एकही फलंदाज जास्त वेळ क्रीझवर टिकू शकला नाही.

टॉम कूपर, टिम प्रिंगल, स्कॉट एडवर्ड्स यांना चांगली कामगिरी करता आली नाही. त्यामुळे नेदरलँडचा संघ अवघ्या १२३ धावांवर आटोपला. भारताकडून या सामन्यात भुवनेश्वर कुमार, रविचंद्रन अश्विन, अर्शदीप सिंग आणि अक्षर पटेल यांनी २-२ बळी घेतले.

महत्वाच्या बातम्या-
Bachchu Kadu : मंत्रिमंडळाच्या विस्तारात बच्चू कडूंना मिळणार मंत्रिपद? शिंदे गटातील ‘या’ सात आमदारांचे नाव आहे आघाडीवर
bacchu kadu : आधी सरकारमधून बाहेर पडण्याचा इशारा, आता थेट ठाकरेंचंही समर्थन; बच्चू कडू मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
narendra modi : “मोदी आणि केजरीवाल हे पाखंडी आहेत, ते नेहमीच गांधींचा आणि आंबेडकरांचा अवमान करतात”

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now