Share

सिराज – कुलदीपने मोडले बांगलादेशचे कंबरडे; बांगला फलंदाजांना अक्षरश नाचवले

team india

चितगाव : भारतीय संघ बांगलादेश विरुद्ध चितगाव येथे कसोटी मालिकेतील पहिला सामना खेळत आहे. या सामन्याच्या पहिल्या डावात टीम इंडियाने 404 धावा केल्या होत्या. एकाही फलंदाजाला शतक झळकावता आले नाही पण चेतेश्वर पुजारा व्यतिरिक्त श्रेयस अय्यर आणि रविचंद्रन अश्विनने अर्धशतके झळकावली.

याशिवाय ऋषभ पंत आणि कुलदीप यादव यांनीही चांगली खेळी करत संघाची धावसंख्या 400 च्या पुढे नेली. बांगलादेशची सुरुवात खराब झाली आणि त्यांनी पटापट विकेट्स गमावल्या. बांगलादेशला फॉलोऑनचा धोका आहे. हे टाळण्यासाठी त्यांना अजूनही 72 धावांची गरज आहे.

बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी टीम इंडियाने गुरुवारी आपली स्थिती मजबूत केली. पहिल्या डावात 404 धावा केल्यानंतर भारताने बांगलादेशच्या पहिल्या डावात 8 विकेट्स घेतल्या. यजमानांना आतापर्यंत केवळ 133 धावाच करता आल्या आहेत.

डावखुरा चायनामन फिरकीपटू कुलदीप यादवने भारताकडून सर्वाधिक 4 विकेट घेतल्या आहेत. वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने 3 तर उमेश यादवने 1 बळी घेतला. त्याचवेळी बांगलादेशकडून मुशफिकुर रहीमने सर्वाधिक 28 धावा केल्या. त्याच्याशिवाय लिटन दासने 24 आणि झाकीर हसनने 20 धावा केल्या. नुरुल हसन आणि मेहदी हसन मिराज यांनी 16-16 धावा केल्या.

अशा पडल्या बांगलादेशच्या विकेट 
पहिला : शांतो सिराजच्या चेंडूवर नझमुल हसन यष्टिरक्षक ऋषभ पंतकडे झेलबाद झाला. तो डावातील पहिला चेंडू होता.
दुसरा: यासिर अलीला तिसर्‍या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर उमेश यादवने बोल्ड केले.
तिसरा: 14व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर सिराजने लिटन दासला बोल्ड केले.
चौथा: 17व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर सिराजने झाकीर हसनला पंतकरवी झेलबाद केले.

पाचवा: 25व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर कुलदीप यादवने शाकिबला कोहलीच्या हातून झेलबाद केले.
सहावा: 33व्या षटकाच्या 5व्या चेंडूवर कुलदीपने नुरूलला गिलकरवी झेलबाद केले.
सातवा : कुलदीपने मुशफिकर रहीमला एलबीडब्ल्यू केले.
आठवा : कुलदीपने तैजुल इस्लामला क्लीन बोल्ड केले.

पहिले सत्र: भारतीय फलंदाजांच्या नावावर
दिवसाचे पहिले सत्र भारताचे होते. भारतीय संघाच्या फलंदाजांनी 70 धावा जोडल्या. मात्र, 86 धावांच्या वैयक्तिक धावसंख्येवर श्रेयस अय्यर इबादत हुसेनचा बळी ठरल्याने टीम इंडियालाही मोठा धक्का बसला. श्रेयस बाद झाल्यानंतर अश्विन-कुलदीपने भारतीय डाव पुढे नेला.

दुसरे सत्र: भारताने 56 धावा केल्या, 2 बळीही मिळाले
सलग दुसरे सत्र भारताच्या नावावर होते. या सत्रात एकूण 93 धावा झाल्या आणि 5 विकेट पडल्या. भारताने यातील 56 धावा केल्या. त्यांचे 3 शेवटचे फलंदाज बाद झाले. यानंतर बांगलादेशच्या डावात भारतीय गोलंदाजांनी यजमान संघाच्या आघाडीच्या 2 फलंदाजांना बाद करून टीम इंडियाला मजबूत स्थितीत आणले. या सत्रात बांगलादेशने नझमुल हसन शांतो आणि यासिर अली यांच्या विकेट्स 37 धावांवर गमावल्या.

तिसरे सत्र : भारतीय गोलंदाज चमकले
शेवटच्या सत्रात भारतीय गोलंदाजांची आग ओकली. या सत्रात 96 धावा झाल्या आणि 6 विकेट पडल्या. या सत्रात सिराजने दोन तर कुलदीपने चार बळी घेतले. मोहम्मद सिराजने डावाच्या पहिल्याच चेंडूवर यश मिळवून दिले. त्याने नजमुल हसन शांतोला शून्यावर चालायला लावले. त्यानंतर लिटन दास आणि झाकीर हसनचे विकेटही घेतले.

मोहम्मद सिराजने डावाच्या पहिल्याच चेंडूवर यश मिळवून दिले. त्याने नजमुल हसन शांतोला शून्यावर आऊट केले. त्यानंतर लिटन दास आणि झाकीर हसनचीही विकेट घेतली. चेतेश्वर पुजारा (90), श्रेयस अय्यर (86) आणि रविचंद्रन अश्विन (58) यांच्या अर्धशतकी खेळीने टीम इंडियाची धावसंख्या 400 च्या पुढे नेली.

पहिल्या सत्रात 86 धावा करून श्रेयस अय्यर बाद झाला. त्यानंतर रविचंद्रन अश्विनने 58 आणि कुलदीप यादवने 40 धावा केल्या. या दोघांनी 8व्या विकेटसाठी 92 धावांची भागीदारी केली. बांगलादेशकडून तैजुल इस्लाम आणि मेहदी हसन मिराज यांनी 4-4 विकेट घेतल्या. इबादत हुसेन आणि खालिद अहमद यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.

कुलदीप यादवने 2017 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताकडून कसोटी खेळली होती. सातत्यपूर्ण कामगिरी करूनही त्याचे संघातील स्थान अद्याप निश्चित झालेले नाही. मात्र त्याला बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीत खेळण्याची संधी मिळाली. त्याला 25व्या षटकात पहिल्यांदा गोलंदाजी करण्याची संधी मिळाली. त्याच्या दुसऱ्या चेंडूवर कुलदीपने बांगलादेशचा कर्णधार शकिब अल हसनला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. विराट कोहलीने त्याचा झेल घेतला.

यानंतर कुलदीप यादवने संघाचा यष्टिरक्षक फलंदाज नुरुल हसनला बाद केले. त्याला शॉर्ट लेगवर शुभमन गिलने झेलबाद केले. कुलदीप इथेच थांबला नाही. त्याने संघाचा सर्वात धोकादायक फलंदाज मुशफिकर रहीमला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. डीआरएसही रहीमला एलबीडब्ल्यू होण्यापासून वाचवू शकला नाही. कुलदीपने तैजुल इस्लामला बाद करून चौथी विकेट घेतली. कुलदीपने 10 षटकात 33 धावा देत 4 बळी घेतले आहेत. त्याचवेळी अक्षर पटेल आणि अश्विन यांना एकही विकेट घेता आलेली नाही.

या सामन्यापूर्वी कुलदीप यादवने भारताकडून ७ कसोटी सामने खेळले होते. फेब्रुवारी २०२१ मध्ये त्याने इंग्लंडविरुद्ध शेवटची कसोटी खेळली होती. त्याआधी, जानेवारी 2019 मध्ये त्याने शेवटची कसोटी खेळली होती. ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे झालेल्या त्या सामन्यात कुलदीपने 5 विकेट घेतल्या होत्या. यानंतरही पुढील कसोटी खेळण्यासाठी त्याला 25 महिने वाट पाहावी लागली.

ताज्या बातम्या खेळ

Join WhatsApp

Join Now