Anand Mahindra : महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा हे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. सतत देशभरातील सर्व लोकांशी सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्कात राहण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसेच आपल्या ग्राहकांची काय गरज आहे? अथवा त्यांना कोणत्या समस्या येतात, याबाबत माहिती घेण्याचा ते सतत प्रयत्न करत असतात. सोशल मीडियावर वेगवेगळे व्हिडिओ पोस्ट करून ते तरुणांना प्रेरित करत असतात. आकर्षित देखील करतात.
आता आनंद महिंद्रा यांनी आपल्या सोशल मीडिया हँडलवर अशाच प्रकारे एक भन्नाट व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये महिंद्रा कंपनीचा एक ट्रॅक्टर दिसत आहे. जो ट्रॅक्टर कुठल्या देशात आहे? या प्रश्नाचे उत्तर देणाऱ्याला ते खास गिफ्ट देणार आहेत.
आनंद महिंद्रा यांच्या या अनोख्या क्विझमुळे सध्या तरुणांमध्ये या पोस्टची मोठी चर्चा आहे. हा ट्रॅक्टर कोणत्या देशात आहे? या प्रश्नाचे उत्तर जो व्यक्ती पहिल्यांदा देईल. त्या व्यक्तीला आनंद महिंद्रा गिफ्ट देणार आहेत. त्यामुळे हा ट्रॅक्टर कोणत्या देशात आहे? याबाबत अनेकांकडून सोशल मीडियावर वेगवेगळी उत्तर दिली जात आहेत.
या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती लाल रंगाचा ट्रॅक्टर चालवताना दिसत आहे. त्या ट्रॅक्टरमध्ये तो काहीतरी वाहून नेत असतानाचे त्या व्हिडिओत पाहायला मिळत आहे. ‘या व्हिडिओमधील ट्रॅक्टर महिंद्रा कंपनीचा आहे. मात्र हा ट्रॅक्टर नेमका कुठल्या देशात आहे? हे आता तुम्हाला सांगावे लागेल. याचे उत्तर द्या आणि बक्षीस मिळवा,’ असे कॅप्शन महिंद्रा यांनी आपल्या पोस्टला दिले आहे.
https://twitter.com/anandmahindra/status/1580203529821917184?s=20&t=OHanJk4Ha4kOnFSWSO9tPw
या प्रश्नाचे पहिल्यांदा उत्तर देणाऱ्या लकी विनरला महिंद्रा मिनी ट्रॅक्टर देणार आहेत, असे बोलले जाते. आता हे महागडे गिफ्ट कोणाला मिळते? हे पहावे लागेल. मात्र या व्हिडिओला आनंद महिंद्रा यांनी पोस्ट केल्यानंतर काही वेळातच चार लाखांपेक्षा अधिक व्यक्तींनी पाहिले आहे. सोशल मीडियावर या प्रश्नाच्या उत्तराबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत.
काही नेटेकरी हा व्हिडिओ जर्मनीचा असल्याचे म्हणत आहेत. तर काहींना हा व्हिडिओ कॅनडाचा असल्याचे वाटत आहे. मात्र हा व्हिडिओ नेमका कोणत्या देशातील आहे? हे जाणून घेण्यात सर्वजण उत्सुक आहेत. महिंद्रा यांच्या या पोस्टने सोशल मीडियावर एकच धमाल उडवून दिली. तरुणांमध्ये याबाबत उत्सुकता असल्याचे त्यांच्या कमेंट्सवरून दिसून आले.
महत्वाच्या बातम्या-
uddhav thackeray : ठाकरेंसाठी ‘मशाल’ ठरणार गेमचेंजर! फक्त अंधेरीच नव्हे तर अख्या मुंबईसाठी आखली ‘ही’ खास रणनिती
shinde group : ‘फक्त उद्धवसाहेबांकडे बोट करुन दाखवा, तुमचा सगळा हिशेब चुकता करते’
girish mahajan : सत्तेचा माज! शाळेतील लहान्या लेकरांना गिरीश महाजनांची अर्वाच्च भाषेत दमदाटी; रेकाॅर्डींग व्हायरल






