मराठी चित्रपटांचा मोठा एक काळ गाजवणारा अवलिया नट, सर्वांचे लाडके मामा अशोक सराफ आज त्यांचा ७५ वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्यांनी अनेक चित्रपट, मालिका, नाटकांमध्ये काम केले आहे. त्यांच्या विनोदाच्या टाईमिंगचे जग चाहते आहे. त्यांची कामावरची निष्ठा, वेळ पाळण्याची शिस्त सगळ्या सिनेमा इंडस्ट्रीला माहित आहे. त्यांनी व्हॅक्युम क्लिनर या नाटकात काम केले. त्या नाटकाच्या सेटवरचा एक किस्सा अभिनेता चिन्मय मांडलेकरने शेअर केला आहे. पाठीत वेदना होत असताना मामा नाटकाची तालीम करत होते, असे चिन्मयने सांगितले. (In the play, Ashok had done ‘Ha’ horrible type with..)
अशोक सराफ एका उत्तम नटासोबत एक उत्तम माणूस पण आहेत. ते मदतीला धावून येतात, माणसांची काळजी घेतात याचे अनेक जण किस्से सांगत असतात. चिन्मय मांडलेकरने त्याच्या ‘व्हॅक्यूम क्लिनर’ नाटकाच्या तालीमच्या वेळी घडलेला प्रसंग एका मुलाखतीत सांगितला होता. तो म्हणाला, “त्यावेळी नाटकची तालीम जोरदार सुरू होती आणि मामांचा उत्साह पाहण्याजोगा होता. अनेक तरूण कलाकारांना लाजवेल अशा उत्साहात ते तालीम करत होते.”
चिन्मय मांडलेकर पुढे असं म्हणाला, “आम्ही तालीम करत होतो. पण अचानक एके दिवशी मला मामांच्या वागण्यात बदल जाणवू लागला. मी त्यांना कारण विचारलं पण त्यांनी टाळाटाळ केली. नंतर न राहवून मी त्यांच्या ड्रायव्हरला विचारलं तर तो म्हणाला की त्यांच्या पाठीत प्रचंड वेदना होत आहे. असं त्यांना बरेचदा होतं आणि त्यासाठी ते एक विशिष्ट बाम वापरतात. पण आज त्यांनी तो लावलेला नाही. एवढ्या वेदना होत असतानाही ते त्यांचं काम करत आहेत.”
यानंतर एका मुलाखतीत अशोक सराफ यांना या गोष्टीमागचे खरे कारण विचारण्यात आले. तेव्हा ते म्हणाले, “मला पाठदुखीची समस्या आहे आणि त्यासाठी मी जो बाम वापरतो त्याला फारच उग्र वास येतो. ज्यामुळे इतरांना काम करताना समस्या आली असती किंवा ते माझ्यामुळे काही न बोलता तो उग्र वास सहन करत राहिले असते. पण मला त्यांना त्रास द्यायचा नव्हता त्यामुळे मी त्यावेळी वेदना होत असतानाही काम करत राहिलो.” त्यावेळी अशोक सराफ यांचं उत्तर ऐकून सर्वच लोकं भावुक झाले.
अशोक सराफ यांच्या प्रेमळ, दिलदार स्वभावाने त्यांनी माणसांची मने जिंकली आहेत. नाना पाटेकर पण असाच एक मामांच्या दिलदारपणाचा किस्सा कायम सर्व ठिकाणी सांगत असतात. या झगमगत्या सिनेमाच्या जगात पण माणुसकी टिकवून ठेवणारे अशोकमामा इंडस्ट्रीतील अनेकांना त्यांच्या जवळचा, हक्काचा माणूस वाटतात.
अशोक मामांचे सिनेमासृष्टीत अफाट काम आहे. अशोक सराफ यांनी अनेक गंभीर भूमिका असणारे सिनेमे केले आहेत. पण लोकांनी त्यांच्या विनोदी भूमिकांना प्रचंड प्रतिसाद दिला. त्यांच्या लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगावकर यांसोबत असलेल्या ‘बनवाबनवी’ चित्रपटाने लोकांच्या मनावर राज्य केले. खूप गाजलेल्या या चित्रपटाने अशोक मामांना यशाच्या नव्या शिखरावर नेऊन ठेवले. अशोक सराफ आजच्या नव्या कलाकार मंडळींसाठी प्रेरणास्थान आहेत.
महत्वाच्या बातम्या –
‘तो’ काळ आला आणि आपली मराठी चित्रपटसृष्टी खालावली, अशोकमामा स्पष्टच बोलले
पुरोगामी म्हणवणाऱ्या महाराष्ट्रात आजही काळी जादू, मांत्रिकांच्या नादात पुण्यातील ७ मोठे व्यवसायिक झाले उद्ध्वस्त
२० वर्षांपासून माय-लेक घेत होते एकमेकांचा शोध, ‘तो’ एक मेसेज अन् झाली दोघांची भेट; कहाणी ऐकून डोळे पाणावतील