Share

गेल्या १० वर्षात देशात एकही दंगल झालेली नाही, त्यामुळे कुठेही असहिष्णुता नाही – जग्गी वासुदेव

ईशा फाऊंडेशनचे संस्थापक सद्गुरु जग्गी वासुदेव( Sadguru Jaggi Vasudev) यांनी काही दिवसांपूर्वी ‘माती वाचवा’ या जागतिक मोहिमेची घोषणा केली होती. या मोहिमेंतर्गत सद्गुरु जग्गी वासुदेव यांनी २७ देशांमध्ये ३०,००० किलोमीटरचा मोटरसायकल प्रवास केला आहे. सद्गुरु सध्या भारतात पोहचले आहेत. यावेळी सद्गुरु जग्गी वासुदेव यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. (In the last 10 years, there has been no riot in the country, so there is no intolerance anywhere – Jaggi Vasudev)

प्रसार माध्यमांशी संवाद साधताना सद्गुरु जग्गी वासुदेव यांनी देशातील धार्मिक असहिष्णुतेच्या मुद्द्यावर भाष्य केलं आहे. “भारतामधील टेलिव्हिजन स्टुडिओमध्ये धार्मिक असहिष्णुतेच्या मुद्यावर वेगवेगळ्या चर्चा सुरु आहेत. देशात धार्मिक असहिष्णुता वाढत आहे, हे सांगण्यासाठी अतिशयोक्ती केली जात आहे”, असे ईशा फाऊंडेशनचे संस्थापक सद्गुरु जग्गी वासुदेव यांनी सांगितले आहे.

“गेल्या दशकात मोठ्या जातीय हिंसाचारापासून आपला देश मुक्त झाला आहे. आमच्या महाविद्यालयीन दिवसांत देशामध्ये मोठ्या दंगली झाल्या होत्या. पण गेल्या दहा वर्षात देशात एकही मोठी जातीय दंगल झाली”, असे सद्गुरु जग्गी वासुदेव यांनी सांगितले आहे. यावेळी सद्गुरु जग्गी वासुदेव यांनी टेलिव्हिजन स्टुडिओमधील चर्चांवर देखील मतं व्यक्त केलं आहे.

ईशा फाऊंडेशनचे संस्थापक सद्गुरु जग्गी वासुदेव म्हणाले की, “मला वाटते की आपण काही विषयांमध्ये थोडी अतिशयोक्ती करतो. होय, काही मुद्दे आहेत ज्यावर वादविवाद, चर्चा झाल्या पाहिजेत. पण टेलिव्हिजन वाहिन्यांवर खूप गरमागरम चर्चा सुरु आहे. हे वातावरण तुम्हाला रस्त्यावर कुठेही दिसत नाही. तुम्ही संपूर्ण दिल्ली फिरून पहा. देशातील कोणत्याही गावात असहिष्णुता किंवा हिंसाचार असे तुम्हाला काहीही दिसणार नाही.”

ईशा फाऊंडेशनचे संस्थापक सद्गुरु जग्गी वासुदेव पुढे म्हणाले की, “आमच्या कॉलेजच्या दिवसांमध्ये जातीय हिंसाचाराच्या घटना ‘सामान्य’ मानल्या जात होत्या. पण माझ्या मते, गेल्या २५ वर्षांत जातीय हिंसाचाराच्या घटना लक्षणीयरीत्या कमी झाल्या आहेत. जेव्हा आम्ही कॉलेजमध्ये होतो, त्यावेळी असे एकही वर्ष नव्हते जेव्हा देशात मोठी जातीय दंगल झाली नसेल. ”

“पण गेल्या १० वर्षांत मी जातीय हिंसाचाराच्या घटना ऐकल्या नाहीत. तुम्ही अशा गोष्टी ऐकल्या नसतील. दुर्दैवाने काही ठिकाणी थोडंफार घडलं असेल. परंतु मोठ्या प्रमाणात जातीय हिंसाचार घडला नाही. देशाला मोठ्या हिंसाचाराला समोर जावं लागत आहे, असे जे आपण ऐकायचो. ते आता ऐकावं लागत नाही. ही खूप आनंददायी गोष्ट आहे”, असे सद्गुरु जग्गी वासुदेव यांनी सांगितले आहे.

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now