नुकतेच पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला. पंजाब राज्य सोडून इतर चार राज्यात भाजपचा विजय झाला. दरम्यान, शिवसेनेने उत्तर प्रदेश आणि गोवा मधून आपले उमेदवार उभे केले होते, मात्र त्यांच्या हाती निराशा आली. असे असले तरी उत्तर प्रदेशात एका जागेवर मात्र भाजपला शिवसेनेमुळे पराभव पत्करावा लागला आहे.
शिवसेनेने उत्तर प्रदेश आणि गोवा राज्यातून विधानसभा निवडणुक लढवली होती, मात्र त्यांचा दोन्ही ठिकाणी पराभव झाला. याठिकाणी शिवसेनेला नोटापेक्षा कमी मते मिळाली. यामुळे भाजपकडून शिवसेनेला डिवचण्यात येत आहे. मात्र, असे असले तरी, उत्तर प्रदेशात एका जागेवर भाजपला शिवसेनेमुळे पराभव पत्करावा लागला आहे.
उत्तर प्रदेश मधील डुमरियागंज विधानसभा मतदारसंघात भाजपच्या उमेदवाराला अवघ्या 771 मतांनी पराभव स्वीकारावा लागला आहे. कारण, या ठिकाणी शिवसेनेच्या उमेदवाराने 3 हजाराहून अधिक मते घेतली आहेत. यामुळे शिवसेनेसाठी ही बाब अतिशय दिलासादायक आहे.
माहितीनुसार, या ठिकाणी शिवसेनेचा उमेदवार नसता तर भाजपच्या उमेदवाराचा विजय झाला असता असं बोललं जातं आहे. या ठिकाणी शिवसेनेच्या उमेदवाराला सर्वाधिक मतं मिळाली असल्यामुळे, महाराष्ट्राबाहेर शिवसेनेची जिंकण्या एवढी ताकद नसली तरी भाजपच्या उमेदवारांना पाडता येईल एवढी ताकद शिवसेना निर्माण करत असल्याचं दिसत आहे.
त्यामुळे आता शिवसेना भाजपला भविष्यात आव्हान ठरू शकते असं सांगितलं जात आहे. डुमरियागंज या ठिकाणी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे शैलेंद्र ऊर्फ राजू श्रीवास्तव उभे होते. त्यांनी या निवडणुकीत 3698 मते घेतली आहेत.
तर दुसरीकडे भाजपचे उमेदवार राघवेंद्र प्रताप सिंह यांना 84095 मते मिळाली आहेत. राघवेंद्र प्रताप सिंह यांचा केवळ 771 मतांनी पराभव केला. त्यामुळे, शिवसेनेने मते खाल्ल्याने त्यांचा पराभव झाल्याचं दिसून येत आहे.या मतदारसंघात समाजवादी पार्टीचे उमेदवार सईदा खातून या 84586 मते घेऊन विजयी झाल्या.