Yogurt: राज्यभरात दहीहंडीचा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा झाला. गोविंदांचा उत्साह वाढवण्यासाठी चक्क दहीहंडीला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी हजेरी लावली. याच नवख्या गोष्टींसोबत अनेक आश्चर्याचे धक्के बसवणाऱ्या घटना दहीहंडी उत्सवा दरम्यान घडल्या. अशीच एक घटना उल्हासनगर भागात घडल्याचे समोर येत आहे.
उल्हासनगर भागात नशेत टल्ली झालेल्या एका माथेफिरूने चक्क बक्षीसासाठी हंडी फोडली. आणि मग पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. सुटका झाल्यानंतर तो हंडी फोडण्याच्या बक्षीस रकमेची मागणी करत आहे. हा विचित्र प्रकार उल्हासनगर भागात घडल्याने नागरिकांमध्ये याबाबत चांगलीच चर्चा रंगल्याचे दिसते. शिंदे गटाचे समर्थक असणाऱ्या अरुण आशान यांनी या दहीहंडीचे आयोजन केले होते.
आशान यांच्या जय भवानी मंडळाने दहीहंडी फोडण्यासाठी ५५ हजार ५५५ अशी बक्षीस रक्कम जाहीर केली होती. उल्हासनगर भागातल्या भोला वाघमारे या व्यक्तीने ती रक्कम मिळवण्यासाठी ८० फुटावर बांधलेल्या दहीहंडीच्या दोरीला लटकून हंडी फोडली.
अचानक घडलेल्या या विचित्र प्रकारानंतर पोलिसांनी भोला वाघमारेला अटक केली. तो नशेत असल्याचा दावा पोलिसांनी केला. मात्र सुटका झाल्यानंतर वाघमारे या व्यक्तीने हंडी फोडण्यासाठी मंडळाने जी बक्षीस रक्कम जाहीर केली होती. ती बक्षिस रक्कम मला द्यावी, अशी मागणी केली आहे.
भोला वाघमारेचं असं म्हणणं आहे की, ती हंडी मी फोडली. त्यामुळे बक्षीस रक्कम मला मिळावी. त्याच्या वकिलानेही असे सांगितले की, हंडी फोडण्यासाठी रक्कम जाहीर केली होती. मानवी मनोरे रचून ती हंडी फोडावी, असा उल्लेख कुठेही नव्हता. त्यामुळे भोला वाघमारे बक्षीस रकमेवर आपला हक्क सांगू शकतो.
तसेच हंडी फोडताना भोला वाघमारे नशेत होता, हे पोलीस सिद्ध करू शकले नाहीत. त्यामुळे हंडी फोडण्याची रक्कम देण्यात यावी. यासाठी आम्ही दहीहंडी आयोजित केलेल्या मंडळाला कायदेशीर नोटीस पाठवू शकतो, असं वकिलाने म्हंटलं आहे. या प्रकरणाचं नक्की पुढे काय होतं? बक्षीस रक्कम वाघमारेला मिळते का? हे पहावं लागेल.
महत्वाच्या बातम्या-
‘या’ गिअरमध्ये गाडी चालवल्यास होणार पाच हजारांचा दंड; मोदी सरकारचा मोठा निर्णय
सत्तेचा माज! पगार मागणाऱ्या ड्रायव्हरला भाजप नेत्याची खासदारासमोरच मारहाण
‘नितीन गडकरी यांच्या विरोधातही CBI चा वापर होणार आहे’