शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायक मेटे यांचा अपघाती मृत्यू झाला. अपघातानंतर लवकर मदत मिळाली नाही, असा आरोप त्यांच्या ड्रायव्हरने यावेळी केला आहे. आता या प्रकरणाबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर येत आहे. (In the case of Vinayak Mete accident, the police has detained ‘this’ person)
विनायक मेटे यांच्यासोबत घडलेल्या अपघाताची चौकशी होणार असल्याचे समजते. चौकशीसाठी आठ पथके नेमण्यात आली आहेत. त्यामध्ये फॉरेन्सिक लॅबचा देखील समावेश आहे. तसेच त्यांच्या गाडीवरील ड्रायव्हरची देखील चौकशी केली जाणार आहे.
एकनाथ कदम असे विनायक मेटेंच्या गाडीवर काम करणाऱ्या ड्रायव्हरचे नाव आहे. त्याची चौकशी लवकरात लवकर केली जाणार असल्याचे बोलले जाते. एकनाथ कदम व इतर सहकारी या अपघातावेळी विनायक मेटेंसोबत होते. त्यांना देखील दुखापत झाली आहे.
विनायक मेटे यांचा मुंबई- पुणे द्रुतगती महामार्गावर बोगद्याजवळ अपघात झाला. पहाटे ५ च्या सुमारास झालेल्या अपघातानंतर १ तास उलटून गेला. तरी मदत मिळाली नाही, असा आरोप त्यांच्या ड्रायव्हरने केला आहे.
‘आम्ही ये-जा करणाऱ्या गाड्यांना मदत मागण्याचा खूप प्रयत्न केला. पण कोणीही मदत केली नाही. शेवटी एका टेम्पोवाल्या व्यक्तीने आम्हाला मदत केली. तसेच दरेकरांच्या बॉडीगार्डला कॉल केल्यानंतर मदतीसाठी यंत्रणा हलली,’ असे ड्रायव्हरने सांगितले.
एकनाथ कदम या ड्रायव्हरने मागील अनेक वर्षांपासून विनायक मेटे यांच्या गाडीवर काम केले. विनायक मेटे यांच्या गाडीचा जो अपघात झाला. त्यासंदर्भात अपघातावेळी ड्रायव्हर नशेत होता का?, गाडी कशी धडकली?, नेमका कशामुळे झाला? या सर्व गोष्टींचा पोलीस कसून तपास करत आहेत. अधिक तपासासाठी ड्रायव्हरला ताब्यात घेण्यात येणार असल्याचे समजते.
महत्वाच्या बातम्या-
सरकारवर दबाव टाकायचा असेल तर.., दु:ख व्यक्त करताना संभाजीराजे सरकारवर बरसले
तिरंगा लावण्यासाठी चढले छतावर, घराची कौलं फुटल्यामुळे ज्येष्ठ नागरिकाचा पडून मृत्यु
५२ कुळे असो की १५२..कितीही कुळं उतरली तरी शिवसेना कुणी संपवू शकत नाही; ठाकरेंनी ठणकावले