Share

सैफ आणि अमृताच्या संसारात सारा ठरली मिठाचा खडा? सैफ अली खानने सांगितलं घटस्फोटामागचं कारण

अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री अमृता सिंग यांच्या लग्नाची जेवढी चर्चा झाली तेवढीच त्यांच्या विभक्त होण्याची देखील झाली. 1991 मध्ये कोणत्याही गोष्टींची पर्वा न करता 12 वर्षांनी मोठी असलेल्या अमृतासोबत सैफ अली खानने लग्न केले. मात्र, त्यांचे विभक्त होण्याचे कारण नेमकं काय होतं याबद्दल माहिती झाल्यास तुम्हाला धक्का बसेल.

सैफ अली खान आणि अमृता सिंग या दोघांची पहिली भेट राहुल रवैल यांच्या एका चित्रपटाच्या दरम्यान झाली. या चित्रपटातून सैफ अली खान डेब्यू करणार होता. राहुल अमृताचा चांगला मित्र होता. त्याने या दोघांना एकत्र एक फोटोशूट करायला सांगितलं. फोटोशूटदरम्यान सैफने अमृताच्या खांद्यावर हात ठेवला. त्याने अमृताकडे पाहिलं आणि तो तिच्या प्रेमात पडला.

त्यानंतर त्यांची सतत भेट होऊ लागली. त्यांची मैत्री फुलत गेली आणि मग दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. मग लग्नाचा निर्णय घेतला. सैफ अमृता यांच्यापेक्षा 12 वर्षांनी लहान आहे. तरीदेखील कोणतीही पर्वा न करता त्यानं 1991 मध्ये इस्लाम धर्माच्या रितींनुसार तिच्यासोबत लग्न केलं.

घराकडे जास्त लक्ष देता यावं म्हणून त्यांनी आपल्या करिअरमधून काही काळ ब्रेक घेतला. याकाळात या दोघांना सारा आणि इब्राहिम ही दोन मुलं झाली. पण त्यांच्या या चाललेल्या सुखी संसारात मिठाचा खडा पडला आणि 13 वर्षांनंतर या दोघांनी घटस्फोट घेतला.

2004 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. एका मुलाखतीत सैफ अली खानला एक प्रश्न विचारण्यात आला की, ‘तुम्ही घटस्फोटाच्या कठीण टप्प्यातून गेला होता. तुम्ही मुलांना याबद्दल कसं सांगितलं? तुमच्या मनावर ते ओझं होतं का?’ याचे उत्तर देताना सैफ ने घटस्फोट का घेतला यामागील कारण सांगितलं.

म्हणाला, घटस्फोट घेणं योग्य नाही, आज सुद्धा मला कधी कधी वाटतं की सर्वकाही वेगळं असायला हवं होतं. अमृतापासून वेगळे होणं हा माझ्यासाठी कठीण निर्णय होता. तिच्यासोबत सर्व काही नीट व्हावं, आमचं नातं नीट राहावं यासाठी खूप प्रयत्न केले.  मी अमृतापासून वेगळं होण्याचा विचार कधीच केला नाही.

मी दोन मुलांचा पालक होतो ही खूप मोठी जबाबदारी आहे, मला कळत होतं. कौटुंबिक सुख एखाद्या लहान मुलांना मिळू नये ही सर्वात वाईट गोष्ट आहे, मला याची कल्पना येत होती. अशावेळी घरात होणाऱ्या भांडणाचा मुलांवर परिणाम होऊ नाही, यासाठी मी प्रयत्न केला.

अनेक वेळा घरातील शांततेसाठी असे निर्णय घ्यावे लागतात. मला सारा आणि इब्राहिमला चांगेल वातावरण मिळावे यासाठी हा निर्णय घ्यावा लागला, आणि मी घटस्फोट घेतला. असं सैफ अली खान म्हणाला. त्यांच्या घटस्फोटानंतर सैफ अली खान आणि करीना यांचं लग्न 16 ऑक्टोबर 2012 मध्ये झालं.

बाॅलीवुड

Join WhatsApp

Join Now