election : वाड्या- वस्त्यांवर सध्या ग्रामपंचायत निवडणुकांचा गुलाल उधळला जातोय. प्रचाराच्या तोफा थंडावल्यानंतर राज्यात १६ तारखेला तब्बल १८ जिल्ह्यांमध्ये १ हजार १६६ ग्रामपंचायतीसाठी मतदान पार पडले. या ग्रामपंचायतींच्या निवडणूकीचे निकाल आज लागत आहेत. मात्र येणाऱ्या निकालांमधून शिंदे गटाला मोठा धक्का राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये बसताना दिसत आहे.
शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांच्या स्वतःच्या गावातच महाविकास आघाडीचा उमेदवार विजयी झाला. या धक्क्यातून शिंदे गट सावरत आहे तेच रायगड पाठोपाठ आता रत्नागिरीमध्ये देखील उदय सामंत यांच्या पॅनलमधील उमेदवार शिरगाव ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये पराभूत झाला आहे. त्या ठिकाणी महाविकास आघाडीच्या उमेदवाराने बाजी मारली आहे.
रत्नागिरीमधील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून शिरगाव ग्रामपंचायत ओळखली जाते. या ठिकाणी महाविकास आघाडीच्या फरिदा काझी विजयी झाल्या आहेत. त्यामुळे उदय सामंत यांच्यावर मोठ्या पराभवाचे नामुष्की ओढवली. त्यानंतर पोमेंडी बुद्रुक या ठिकाणीही ठाकरे गटाचा उमेदवाराचा विजय झाला. त्या ठिकाणीही सामंत यांच्या पॅनलच्या उमेदवाराला ठाकरे गटाच्या ममता जोशींनी जब्बर टक्कर देऊन विजय खेचून आणला.
यापुढे फणसोप या ग्रामपंचायतीवर देखील ठाकरे गटाच्या राधिका साळवी सरपंच म्हणून निवडून आल्या. आणि शिंदे गटाला मोठा धक्का या ग्रामपंचायतीच्या जागेवर देखील बसला. फणसोप या ग्रामपंचायतीमध्ये तब्बल १० उमेदवार जिंकून आणत ठाकरे गटाने मोठा विजय मिळवला.
अशाप्रकारे उदय सावंत यांच्या पॅनलला रत्नागिरीच्या अनेक ग्रामपंचायतींमध्ये मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. त्या ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले आहेत. त्यामुळे उद्योगमंत्री उदय सामंत यांची रत्नागिरीत प्रतिष्ठा पणाला लागली असताना त्यांच्यावर पराभवाची नामुष्की ओढवली आहे.
अशाप्रकारे राज्यांमध्ये सत्ता जरी शिंदे गट आणि भाजप यांच्या युतीची असली तरी महाविकास आघाडी स्थानिक पातळीवर आपलं वर्चस्व टिकवून ठेवण्यात यशस्वी ठरताना दिसत आहे. त्यामुळे शिंदे गटातील मंत्री, आमदारांना अशाप्रकारे स्थानिक पातळीवर पराभव पहावा लागतोय. दुसरीकडे ठाकरे गटाचे उमेदवार मात्र या प्रतिकूल परिस्थितीत आपल्या प्रयत्नांच्या जोरावर यश प्राप्त करण्याचा प्रयत्न करताना दिसतात.
महत्वाच्या बातम्या-
Nusrat: मदरशातला घोटाळा उघड केला म्हणून मुलीला दिली भयंकर शिक्षा, आता केसमध्ये आला नवीन ट्वि्स्ट
Election : ठाण्यात उद्धव ठाकरेंचाच दबदबा! सर्वाधिक जागा मिळवत शिंदे गटाला दिला दणका, वाचा आकडेवारी
Rahul Gandhi : इंदिरा गांधींचे उपकार फेडण्यासाठी आजींनी केलं असं काही की, राहुल गांधीही झाले भावूक