पंजाबमध्ये आपची जोरदार घोडदौड; कॉंग्रेसची मात्र पिछेहाट

पंजाब विधानसभेच्या 117 जागांचे निकाल येत आहेत. गुरुवारी सकाळी 8 वाजता सुरू झालेल्या मतमोजणीत सुरुवातीचा कल आम आदमी पक्षाच्या (Aam Aadmi Party) बाजूने येताना दिसत आहे. दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळत आहे की, काँग्रेस (Congress) पिछाडीवर पडली आहे.(In Punjab, aap have a strong lead, while the Congress has fallen)

बातमी लिहीपर्यंत शिरोमणी अकाली दल आणि बसपा यांची युती 9 जागांवर पुढे आहे.
त्याचवेळी पंजाब लोक काँग्रेस, भारतीय जनता पार्टी (BJP) आणि शिरोमणी अकाली दल-संयुक्त यांची युती 3 जागेवर पुढे आहे. काँग्रेसबद्दल बोलायचे झाले तर ते सध्या 30 जागांवर आघाडीवर आहे तर आम आदमी पार्टी 44 जागांवर आघाडीवर आहे.

या निवडणुकीत भाजप आणि कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या नेतृत्वाखालील पंजाब लोक काँग्रेस सोबत युती करून निवडणूक लढवत आहेत, तर शिरोमणी अकाली दल बसपासोबत रिंगणात आहे. दुसरीकडे आम आदमी पक्ष आणि काँग्रेस एकटेच लढत आहेत.

एक्झिट पोलनुसार पंजाबमध्ये आम आदमी पक्ष बहुमत मिळवू शकतो, तर काँग्रेसच्या जागा पूर्वीपेक्षा खूपच कमी होण्याची शक्यता आहे. सर्वच एक्झीट पोल्सनी आम आदमी पक्षाच्या बाजूने कौल दिला आहे.

पंजाबमध्ये मुख्य लढत सत्ताधारी काँग्रेस, आम आदमी पार्टी आणि शिरोमणी अकाली दल यांच्यात असल्याचे मानले जात आहे. आम आदमी पार्टीने भगवंत मान यांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून घोषित केले आहे, तर काँग्रेसने मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून घोषित केले आहे.

महत्वाच्या बातम्या-
हा ५ रुपयांचा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची चढाओढ, १ लाखांचे केले तब्बल २७ कोटी
रसोडे में कौन था गाण्यानंतर छोरी पटाता है गाण्याने घातला धुमाकूळ, पहा ८२ लाख लोकांनी पाहिलेला व्हिडीओ
कॅमेऱ्यासमोर खुपच बोल्ड झाली लोलिता भाभी, हॉट फोटोंनी सोशल मिडीयावर घातला धुमाकूळ
तुमचा आणि शिवरायांचा संबंध काय? नुसती भाडणं लावता; राज ठाकरेंनी कोश्यांरींना झाप झाप झापले