हुंडाबळीच्या अनेक घटना आपण वाचत असतो. याचबरोबर हुंड्यासाठी अनेक ठिकाणी सुनेचा मानसिक व शारीरिक छळ केला जातो. तसेच यातून अनेकदा भयानक घटना देखील घडतात. अशीच एक धक्कादायक घटना बिहारमधील लखीसराय जिल्ह्यातील अरमा बंसीपूर येथे घडली आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
धक्कादायक बाब म्हणजे, आरोपींनी सुनेच्या तोंडात बोळा कोंबून तिचे हातपाय दोरीने घट्ट बांधून तिला जिवंत जाळलं आहे. या प्रकरणी सासरच्या मंडळीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सर्व आरोपी फरार झाले आहेत. तसेच या प्रकरणी आता पोलिस पुढील तपास करत आहेत. फरारी आरोपींचा शोध घेत आहे.
कोमल कुमारी (सून ) असं हत्या झालेल्या विवाहित महिलेचं नाव आहे. 1 मे 2019 साली कोमल यांचा विवाह कृष्णा कुमार याच्याशी झाला होता. कोमल सुखी संसाराची स्वप्न पहात असतानाच दुसरीकडे तिच्या सासरची मंडळी तिला हुंड्यासाठी त्रास देत होती. गेल्या अनेक दिवसांपासून कोमलचा छळ होत असल्याची माहिती तपासदरम्यान समोर आली आहे.
कोमलच्या घरच्यांनी लग्नात मोठा हुंडा देऊन थाटामाथाट लग्न लावून दिलं होतं. मात्र तरी देखील सासरची मंडळी माहेरून स्कॉर्पियो आणण्यासाठी कोमलवर दबाव टाकत होते. मात्र स्कॉर्पियो गाडी देण्यास नकार दिल्यानंतर जावई कृष्णा कुमार यांनी कोमलला बेदम मारहाण केली होती, अशी माहिती मृत कोमलचा भाऊ राहुल याने दिली आहे.
दरम्यान, शुक्रवारी आरोपींनी पीडितेला बेदम मारहाण केली. यावेळी आरोपींनी पीडितेच्या तोंडात रुमाल कोंबला होता. त्यानंतर तिचे हातपाय बांधून तिला जिवंत जाळलं. स्वयंपाक करत असताना कुकरचा विस्फोट झाल्याने कोमल भाजली असल्याचा दावा सासरच्यांनी केला होता.
त्यानंतर आरोपींनी जखमी अवस्थेतीत कोमलला पावापुरी येथील रुग्णालयात दाखल केलं. पण शेजारी राहणाऱ्या नागरिकांनी मात्र पोलिसांना सत्य सांगितलं. माहेरहून हुंडा आणत नसल्याने कोमलला आरोपींनी जिवंत जाळल्याची माहिती शेजाऱ्यांनी पोलिसांना दिली.
महत्त्वाच्या बातम्या
प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत बघितल्यामुळे आईने मुलालाच संपवले; औरंगाबादची भयानक घटना
४० वर्षानंतर इतिहास घडणार; ऑलिम्पिक स्पर्धा आयोजनाच्या दृष्टीने भारताचे पहीले पाऊल
‘जय भवानी’ घोषणा बाबासाहेबांचीच, पुरावे दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे उभे करणे फार सोपे आहे पण.., नाना पाटेकरांचे वक्तव्य चर्चेत