मागील काही दिवसांपासून स्टार प्लसवर ‘स्मार्ट जोडी’ हा शो सुरू झाला आहे. या शोमध्ये अनेक जोड्या उपस्थित आहेत. यामध्ये अंकिता लोखंडे आणि विकी जैन, दिग्गज अभिनेत्री भागश्री आणि हिमालय दसानी असे अनेक जोड्या आहेत. या शोमध्ये जोडपे त्यांच्या प्रेम आणि लग्नाची कहाणी सांगताना दिसत आहेत. आता अलीकडेच टीव्ही अभिनेता अर्जुन बिजलानीनेही त्याच्या लग्नाशी संबंधित एक मजेदार किस्सा सर्वांना सांगितला आहे.
अर्जुन बिजलानीचे लव्ह मॅरेज झाले असल्याचे आपल्या सर्वांच माहिती आहे. तो नेहा स्वामीला बरेच वर्ष डेट करत होता. त्यानंतर अर्जुन बिजलानीने २०१३ मध्ये तिच्याशी लग्न केले. लग्नाच्या इतक्या वर्षानंतरच या जोडप्याची केमिस्ट्री लोकांची मने जिंकत आहे. चाहत्यांना या दोघांना सोबत पाहायला खूप आवडते.
या दोघांनाही एक गोंडस मुलगा देखील आहे. त्याचे नाव अयान बिजलानी आहे. आजच्या या लेखात या जोडप्याच्या लग्नाशी संबंधित एक मजेदार किस्सा सांगणार आहोत. खरंतर, नुकताच ‘स्मार्ट जोडी’ या शोच्या आगामी भागाचा एक प्रोमो व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ अर्जूनने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे.
या क्लिपमध्ये अर्जुन बिजलानी त्याच्या लग्नाचा एक मजेदार किस्सा सांगताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये अर्जुन सांगत आहे की, “त्याचे लग्न इस्कॉन मंदिरात झाले होते. ढोल-ताश्याच्या गजरात लग्नाची वरात निघाली होती. तेव्हा काही महिलांनी येऊन हे सर्व थांबवले होते. तसेच आवाज करू नका असे ही सांगितले होते. कारण तो सायलेंट झोन होता.”
तसेच तो पुढे म्हणाला की, “सर्व विधी झाले आणि मंगळसूत्र घालण्याची विधी सुरू झाली होती. त्यावेळी पंडितजींनी नेहाच्या गळ्यात मंगळसूत्र घालण्यास सांगितले. तेव्हा सर्वजण मंगळसूत्र शोधू लागले. मग मला आठवलं की, मी मंगळसूत्र घरीच विसरला होता.” अर्जुनचा हा किस्सा ऐकून उपस्थित सर्व प्रेक्षक आणि जोडपे जोरजोरात हसू लागले.
काही दिवसांपूर्वीच, अर्जुनने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली होती. ज्यामध्ये त्याने एक तुटलेले हृदय इमोजी बनवले आणि कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘कायमचे खोटे.’ ही पोस्ट पाहिल्यानंतर त्याच्या चाहत्यांना आणि जवळच्या लोकांना वाटले की, कदाचित त्याच्या वैवाहिक आयुष्यात काही समस्या निर्माण झाली आहे. मात्र, त्यानंतर त्याने फोटो शेअर करत त्याने या सर्व गोष्टींना पूर्णविराम लावला.