आजच्या बेभान तरुणाईला जल्लोष करताना कोणत्याही गोष्टीचे भान राहत नाही. हे अनेकदा समोर आले आहे. अशाच प्रकारचा हैराण करणारा व्हिडिओ कोल्हापुरातून समोर येत आहे. नशेत सिगारेट ओढताना छत्रपती शिवाजी महाराज व शाहू महाराजांच्या फोटोंसमोर तरुण मुली धिंगाणा घालत असताना व्हिडिओत दिसत आहे. (young women are exuding cigarette smoke)
कोल्हापुरातील पंचगंगा तालीम मंडळासमोर शिवाजी महाराज व शाहू महाराजांच्या फोटोंसमोर डॉल्बीच्या गाण्यांवर नाचत, सिगरेटचा धूर सोडत, तरुण मुली फुल धिंगाणा घालताना या व्हिडिओमध्ये दिसतात. घडलेल्या या विचित्र प्रकारावर परिसरातील नागरिक संताप व्यक्त करत आहेत.
महापुरुषांच्या फोटोंसमोर नाचत धिंगाणा घालणाऱ्या या तरुण मुलींविषयी शिवसेना शहर प्रमुख रविकुमार इंगवले यांनी पोलिसात तक्रार केली आहे. संबंधित व्हिडिओत दिसणाऱ्या तरुण मुलींच्या ग्रुपवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
कोल्हापुरातील शुक्रवार पेठ परिसरातील पंचगंगा तालीम मंडळाच्या मिरवणुकीतील हा व्हिडिओ असल्याचे समोर येत आहे. डीजेच्या गाण्यांवर नशा करून नाचताना, धांगडधिंगा घालताना या मुली दिसत आहेत. खेदाची गोष्ट म्हणजे त्यांच्यासमोर छत्रपती शिवाजी महाराज व शाहू महाराजांचे फोटो देखील व्हिडिओत दिसत आहेत.
या मिरवणुकीत तरुण मुलींसोबत काही तृतीयपंथी देखील या व्हिडिओत दिसत आहेत. महापुरुषांच्या फोटोंसमोर डीजेच्या तालावर नशेत धांगडधिंगा करताना मुली दिसत असलेल्या या व्हिडिओवर अनेकांनी आक्षेप घेतला आहे.
कोल्हापुरात घडलेल्या या प्रकाराबाबत जो व्हिडिओ व्हायरल झाला. तो बघून याबाबत अनेक शिवप्रेमी निषेध व्यक्त करत आहेत. या व्हिडिओत आढळणाऱ्या तरुण मुलींवर तसेच संबंधित तालीम मंडळावर पोलिस आता कोणती कारवाई करतील. हे येत्या काळात स्पष्ट होईल. मात्र या प्रकाराबाबत सर्व स्तरावरून राग व्यक्त होताना दिसत आहे.
महत्वाच्या बातम्या-
राज्याचे नवीन शिक्षणमंत्री दीपक केसरकराचं शिक्षण किती झालंय माहिती का? वाचून आश्चर्य वाटेल
Panchand meghwal : दलितांवर होणारे अत्याचार पाहून काँग्रेस आमदाराचे मन दुखावले, दिला राजीनामा
सामान्यांचे आबा! ‘या’ चार निर्णयांमुळे आर आर पाटलांनी लोकांच्या मनात वेगळं घर केलं होतं