Ajit Pawar: विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या शिस्तीबाबत आणि वेळ पाळण्याबाबत सगळेच लोक जाणून आहेत. मात्र पावसाळी अधिवेशनात त्यांच्या याच स्वभावाचा प्रत्यय सभागृहात उपस्थित आमदारांना आला. अजित पवार अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी कामकाज चालू असताना सभागृहाच्या नियमात न बसणाऱ्या कृतीवर आक्षेप घेताना दिसले.
पावसाळी अधिवेशनाच्या सत्ताधारी भाजपचे अनेक आमदार गैरहजर असल्याने पवारांनी नाराजी व्यक्त केली होती. मात्र सभागृहातच अजित पवारांच्या करड्या नजरेतून भाजपचे जयकुमार रावल लपून राहिले नाहीत. भाजपनेते जयकुमार रावल गॅलरीत बसले होते. त्यामुळे सभागृहाचा नियमभंग झाल्याचे अजित पवारांनी यावेळी अध्यक्षांच्या निदर्शनास आणून दिले.
अधिवेशनात भाजप आमदारांच्या मोठ्या गैरहजेरीवर अजित पवार मागील दोन दिवस सातत्याने नाराजी व्यक्त करत होते. मात्र काल आदित्य ठाकरे भाषण करताना या मुद्द्यावर बोलले. ते म्हणाले, ‘महाविकास आघाडी सरकारच्या काळात आमचे उपमुख्यमंत्री अजित पवार आम्हाला तंबी देत.’
‘अधिवेशनाच्या काळात आमदारांनी सभागृहात ठासुन बसायचं. सभागृह अजिबात सोडायचं नाही.. आम्हालाही तीच सवय लागली होती. मात्र सध्याचे सरकारमधील मंत्री सभागृहात उपस्थित नसतात,’ अशा शब्दात आदित्य ठाकरे आपली नाराजी जाहीर करत असतानाच अजित पवार उठले.
त्यांनी आदित्य ठाकरे यांच्या दिशेने हात करत त्यांना थांबण्याचा इशारा केला. व स्वतः बोलायला सुरुवात केली. अजित पवार म्हणाले की, ‘सभागृहाचा नियम आहे की, आमदारांना गॅलरीत बसताच येत नाही. त्यांना सभागृहात बसायचं असतं. पण असं असतानाही भाजप आमदार जयकुमार रावल गॅलरीत बसलेत.’
‘आता मी ऑब्जेक्शन घेतल्यावर जयकुमार रावल तिथनं पळून गेले.पण अध्यक्ष महोदय.. हे काही बरोबर नाही,’ असं म्हणत अजित पवारांनी सभागृहाच्या नियमावर नेमकेपणाने बोट ठेवले. या प्रसंगातून अजित पवारांमधल्या शिस्तप्रिय व्यक्तीचे सभागृहाला दर्शन झाले. मात्र त्यांच्या रागापुढे भाजपचे मंत्री राहिलेल्या आमदाराने पण पळ काढल्यामुळे राजकीय वर्तुळात याची चांगलीच चर्चा रंगली.
महत्वाच्या बातम्या-
VIDEO: भर रस्त्यात गाडी अडवून मंत्र्यावर चाकूने हल्ला, हल्ला करण्यापुर्वी वाचली कुराण अन्…
Strange incident : पार्टी करताना दारूच्या नशेत मित्रांनी गुप्तांगात टाकला ग्लास; वेदनांनी कळवळणाऱ्या तरूणाला शेवटी….
Rohit Pawar ; अमोल मिटकरींना गुद्दे तर रोहीत पवारांची काॅलर खेचली; विधावभवनात आमदारांमध्ये हाणामारी