महाविकास आघाडी पुन्हा एकदा जोमाने कामाला लागली आहे. राज्यात शिंदे – फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून महाविकास आघाडीचे पुढं काय होणार? हा प्रश्न सध्या राजकीय वर्तुळात उपस्थित झाला आहे. शिवसेनेणे भाजपशी युती तोडून राष्ट्रवादी – कॉंग्रेस आणि कॉंग्रेससोबत सरकार स्थापन केलं होतं.
मात्र शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे ठाकरे सरकार अडीच वर्षात सत्तेतून बाहेर पडलं. महाविकास आघाडीत बैठकांचे सत्र सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनेही कंबर कसली असून, शिवसेनेतील बंडखोर आमदारांना टार्गेट करून त्याचा वापर आपल्या फायद्यासाठी करून घेण्याची नवी रणनीति आखल्याचे सांगितले जात आहे.
याबाबत बोलताना राष्ट्रवादी – कॉंग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी प्लॅन सांगितला आहे. आज घरोघरी आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन झालं आहे. नेते मंडळींच्या घरी देखील बाप्पा विराजमान झाले आहेत. मिटकरी यांच्या घरीची गणरायाचं आगमन झालं आहे.
या आगमन सोहळ्यानंतर माध्यमांशी बोलताना मिटकरी यांनी राष्ट्रवादीची भूमिका सविस्तर सांगितली आहे. शिवसेनेचे बंडखोर राष्ट्रवादीत आणण्यासाठी राष्ट्रवादीने प्लॅन आखल्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहेत. हा प्लॅन नेमका काय आहे? याबाबत मिटकरी यांना विचारले.
दरम्यान, शिंदे गटातील बंडखोर आमदार प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या संपर्कात असल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट अमोल मिटकरी यांनी सांगितले आहे. मिटकरी यांच्या या व्यक्तव्यानंतर सर्वांच्याच भुवया उंचवल्या आहेत. आता नेमके कोणते बंडखोर पाटील यांच्या संपर्कात आहे, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
राज्यात येणाऱ्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या विरोधक अनेक दावे करताना पहायला मिळत आहे. मात्र यातील किती दावे सत्यात उतरतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. सध्या मिटकरी यांनी केलेल्या व्यक्तव्यावर शिंदे गटातून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाहीये.