Share

बीडमध्ये दोन सेकंदातच जमीनदोस्त झाली भलीमोठी इमारत, पत्रकाराच्या सतर्कतेमुळे वाचले अनेकांचे प्राण

काळजाचा ठोका चुकवणारी बीड जिल्ह्यात घटना घडली आहे. अवघ्या दहा मिनिटातच चार मजली इमारत जमीनदोस्त झाली आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. एका स्थानिक पत्रकाराच्या सतर्कतेमुळे कित्येक जणांचे प्राण वाचले आहेत. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ एका कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

जिल्ह्याच्या मध्यवर्ती भागात पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयाजवळ ही इमारत होती. याबाबत स्थानिक पत्रकार ज्ञानेश्वर वायबसे यांनी माहिती दिली होती. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत सगळी इमारत खाली केली. अवघ्या १० मिनिटातच इमारत पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे खाली कोसळली.

स्थानिकांनी ही संपूर्ण घटना कैद केली आहे. या घटनेचे नंतर व्हिडिओ  व्हायरल झाले आहेत. या व्हायरल व्हिडिओमध्ये केवळ ५ सेकंदांमध्ये इमारत एका बाजुला झुकते. नंतर खाली कोसळते. इमारतीची अवस्था पाहता इमारत  जुनी नसल्याचे दिसते. परंतु तरीही ती कोसळली आहे.

https://twitter.com/MulukhMaidan/status/1534527135276494848?s=20&t=GeNIE3bkjR8TDwPcTlkJJA

या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी नागरिकांमध्ये  घबराटीचे वातावरण पसरले आहे. पोलिस अधीक्षकांच्या कार्यालयासमोरील दोन इमारतींच्या मध्यभागी बांधकाम सुरु होते. त्यावेळी पाया खोदत असताना या इमारतीला माेठा हादरा बसला होता. त्यामुळे ती एका बाजुला झुकली होती.

दरम्यान, या संपुर्ण घटनेला जबाबदार कोण असा सवाल उपस्थित होत आहे. पोलिस या घटनेचा तपास करत आहेत. बांधकाम करत असताना हलगर्जीपणामुळे ही दुर्घटना घडल्याचा दावा नागरिक करत आहेत.  तपासानंतर या घटनेतील दाेषींवर कारवाई करण्यात येईल असे पोलिसांनी सांगितले आहे.

या घटनेनंतर इमारतीतील नागरिकांचा संसार उघड्यावर पडला आहे. आपल्या डोळ्यांदेखत संसार उघड्यावर पडताना पाहुन नागरिकांचा जीव कासावीस झाला होता. परंतु एका स्थानिक पत्रकाराच्या सतर्कतेमुळे कित्येक जणांचे प्राण वाचले आहेत.

इतर ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now