गुढी पाडव्यानिमित्त शनिवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा छत्रपती शिवाजी महाराज पार्कजवळ मेळावा घेण्यात आला होता. या मेळाव्यात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वेगवेगळ्या मुद्यांवर भाष्य केले आहे. यावेळी राज ठाकरेंनी मशिदीच्या बाहेर लावण्यात येणाऱ्या भोंग्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. (imtiyaz jaleel first reaction on raj thackeray)
मी धर्मांध नाही, धर्माभिमानी आहे. प्रार्थनेला माझा विरोध नाही, पण मशिदींवरील भोंगे खाली उतरवावे, हा निर्णय सरकारने घ्यावा. निर्णय घेतला नाही, तर मशिदींसमोर हनूमान चालिसाचे स्पीकर लावले जातील, असा इशारा राज ठाकरे यांनी ठाकरे सरकारला दिला आहे.
राज ठाकरेंच्या या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. तसेच राज ठाकरेंच्या या वक्तव्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याकडून प्रतिक्रिया आल्या आहेत. पण आता असदुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएम पक्षानं मात्र राज ठाकरेंच्या भाषणावर प्रतिक्रिया देणं टाळलं आहे. याबाबत एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी माहिती दिली आहे.
राज ठाकरेंच्या भाषणावर कोणतीही प्रतिक्रिया न देण्याच्या सूचना मीच महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांना दिल्या आहे. सध्या त्यावर आम्हाला काहीही बोलायचं नाहीये, असे इम्तियाज जलील यांनी म्हटले आहे. यावेळी त्यांना कारण विचारले असता वेळ आल्यावर आपण बोलू असे ते म्हणाले आहे.
राज ठाकरेंनी मशिदींचे भोंगे खाली उतरवण्याबाबत वक्तव्य केले आहे. मशिदींवरील लाऊडस्पीकर उतरवण्याबाबत राज्य सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा, नाहीतर दुप्पट आवाजात लाऊडस्पीकर लावून हनूमान चालिसा वाजवू, असे राज ठाकरे म्हणाले होते.
तसेच मुंबईतील झोपडपट्ट्यांमधील मशिदींची आणि मदरसांची पोलिसांनी नीट तपासणी केल्यास अनेक गोष्टी कळतील. ज्यापद्धतीनं ईडी, आयकर आणि सीबीआयच्या धाडी पडत आहे. अशा धाडी मदरशांवर घाला, अशी माझी पंतप्रधान नरेंद्र मोदींना विनंती आहे, असेही राज ठाकरे यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या-
अजित पवारांचा राज ठाकरेंना ‘दादा’ स्टाईलने टोला; म्हणाले वाह रे पठ्ठ्या, जेव्हा…
राज ठाकरेंच्या भाषणावर काहीही बोलू नका, MIM खासदार इम्तियाज जलील यांच्या कार्यकर्त्यांना सूचना; म्हणाले…
भारताच्या ‘या’ स्टेशनवर जाण्यासाठी लागतो व्हिसा; नियम पाळले नाही, तर थेट टाकतात तुरुंगात