Share

पटो ना पटो, आदेश पाळावाच लागेल; भोंग्यांच्या मुद्द्यावर इम्तीयाज जलीलांनी मुस्लिमांना केले ‘हे’ आवाहन

jalil
औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेनंतर पहिलीच आणि लक्षवेधी प्रतिक्रिया दिली आहे. ‘प्रार्थनास्थळांवरील भोंग्यांबद्दल सर्वोच्च न्यायालयानं आदेश दिला आहे. तो आदेश पटो न पटो, पाळवाच लागेल,’ या शब्दांत जलील यांनी पक्षाची भूमिका परखडपणे मांडली.

काल औरंगाबादमध्ये बोलताना राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदींवरील भोंग्याचा मुद्दा हाती घेत राजकीय वर्तुळाचे लक्ष आपल्याकडे वळवले आहे. ‘४ मेपासून कोणाचंही ऐकून घेणार नाही. मशिदीचे भोंगे सुरू झाले की त्यांच्यासमोर दुप्पट आवाजात हनुमान चालिसा लावणारच,’ असा इशारा राज ठाकरेंनी दिला.

याबाबत बोलताना राज म्हणाले, ‘मशिदीवरील भोंगे हा धार्मिक विषय नाही. तो सामाजिक आहे. मात्र ज्याला कोणाला हा धार्मिक विषय वाटत असेल, त्यांना मग आम्ही धर्मानेचं उत्तर देऊ. ४ मेपासून मशिदीचे भोंगे सुरू झाले की त्यांच्यासमोर दुप्पट आवाजात हनुमान चालिसा लावणारच.’

यावर प्रतिक्रिया देताना खासदार इम्तियाज जलील यांनी अगदी शांतपणे यावर सविस्तर भाष्य केलं आहे. याबाबत बोलताना ते म्हणतात, ‘राज यांच्या अल्टिमेटमबाबत महाराष्ट्र सरकार, पोलीस प्रशासन निर्णय घेईल. राज ठाकरे यांनी मुस्लिमांना अल्टिमेटम दिलं नसून राज्य सरकारला दिला आहे. मुस्लिम समाजाने यावर प्रतिक्रिया देण्याची काहीही गरज नसल्याचे त्यांनी सांगितलं आहे.

तसेच राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना भोंग्यांवर हनुमान चालिसा लावण्याचे आदेश दिलेत, पण हे समाजाची दिशाभूल करण्याचे प्रयत्न असल्याची जहरी टीका खासदार जलील यांनी थेट राज ठाकरेंवर केली आहे. दरम्यान, जलील यांच्या टीकेवर अद्याप मनसेचे प्रत्युत्तर आलेलं नाहीये.

तसेच पुढे बोलताना जलील म्हणाले, ‘मी चुकीच्या गोष्टींचं समर्थन करणार नाही. प्रार्थनास्थळांवरील भोंग्यांबद्दल सर्वोच्च न्यायालयानं आदेश दिला आहे. तो आदेश पटो न पटो, पाळवाच लागेल, अशा शब्दांत जलील भूमिका स्पष्ट केली. ते याबाबत माध्यमांशी बोलत होते.

महत्त्वाच्या बातम्या 
इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now