Share

वाईन दुकानात तर येऊ द्या, मी स्वतः दुकानं फोडतो, इम्तियाज जलीलांचे ठाकरेंना थेट चॅलेंज

राज्यातील सुपरमार्केटमध्ये आता वाईन ची विक्री करता येणार आहे, अशा प्रकारचा निर्णय नुकताच राज्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. यानुसार एक हजार स्केअर फुटाच्या सुपर मार्केटमध्ये वाईनची विक्री करता येऊ शकेल. मात्र राज्य सरकारच्या या निर्णयाला आता औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी कडाडून विरोध केला आहे.

राज्य सरकारच्या वाईन विक्रीच्या निर्णयाचा सध्या विरोधक विरोध करत आहेत. त्यातच औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी देखील राज्य सरकारच्या निर्णयावर आक्षेप घेतला आहे. हे राज्य शिवछत्रपतींचे आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आहे, इथे वाईन विक्री सारखे निर्णय खपवून घेतले जाणार नाही. असे त्यांनी म्हटले आहे.

वाईन विकून महाराष्ट्राची संस्कृती खराब करण्याचा हा घाट असल्याचं सांगत वाईनरी उद्योगाने जर शेतकऱ्यांचा फायदा होत असेल तर मग त्यांना चरस गांजाची देखील शेती करण्याची परवानगी द्या अशी मागणी इम्तियाज जलील यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

तसेच म्हणाले की, औरंगाबाद मध्ये खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार वा कोणी येऊन वाईन दुकानाचे उद्घाटन केलं तरी खपवून घेतलं जाणार नाही. तसं जर झालं तर दुकानं फोडण्याची जबाबदारी माझी स्वतः ची असेल. असं आव्हान यावेळी इम्तियाज जलील यांनी राज्य सरकारला दिलं आहे.

राज्य सरकारच्या वाईन विकण्याच्या निर्णयाला विरोध करताना म्हणाले की, हे राज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आहे, शिवछत्रपतींचे आहे, आणि असला निर्णय इथं खपवून घेतला जाणार नाही. औरंगाबाद मध्ये एकाही दुकानात वाईन विकू देणार नाही. जर कुठे वाईन विकिलेली दिसली तर माझ्या कार्यकर्त्यांना आणि माय बहिणींना देखील दुकान फोडण्याचा आदेश मी देतो असे म्हणाले.

नुकताच राज्य मंत्रिमंडळ बैठकीत सुपर मार्केट, वॉकिंग स्टोअरमध्ये वाईनच्या विक्रीला परवानगी देण्याबाबत प्रस्ताव आला होता. यास मंजुरी देत राज्य सरकारनं राज्यातील सुपरमार्केटमध्ये आता वाईन विक्रीला परवानगी दिली. पुढच्या वर्षापर्यंत वाईन उद्योगाचा विस्तार 1 हजार कोटी लिटरपर्यंत वाढवण्याचा राज्य सरकारचा विचार आहे.

राजकारण

Join WhatsApp

Join Now