आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमी चर्चेत असणारे शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे यांनी पुन्हा एकदा एक बेधडक वक्तव्य केलं आहे. त्यामुळे राज्यात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता नाकारता येत नाही. इस्लाम हाच देशाचा खरा शत्रू, असल्याचं आक्षेपार्ह वक्तव्य संभाजी भिडेंनी केलं.
पुण्यात माध्यमांशी बोलताना भिडे यांनी “ज्या इस्लामच्या पोटतिडकीतून औरंगजेबाने संभाजी महाराजांना मारलं, तो इस्लाम हा आपल्या देशाचा खरा शत्रू आहे,” असं म्हटलं आहे. ते म्हणाले, “औरंगजेब आणि संभाजी ही दोन माणसं होती, त्यांचं वैर होतं म्हणून औरंगजेबने संभाजी महाराजांना तुकडे तुकडे करुन मारलेलं नाहीये.”
तसेच त्याच्या अंतकरणातील इच्छा होती ती वेगळी होती. कन्याकुमारी ते काश्मीर असा उभा देश तुकडे तुकडे करुन हा हिंदू धर्म, हिंदू समाज आणि हिंदुस्थान संपवून टाकावा ही त्याच्या पोटातील आग आणि चीड, दृष्ट भावना त्याने संभाजी महाराजांच्या बलिदानातून पूर्ण करुन घेत अंशत: समाधान मिळवलं,” असं भिडे म्हणाले होते.
यावर आता एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी तिखट शब्दात प्रतिक्रिया दिली आहे. “अजमल कसाबने देशाला बंदुकीच्या जोरावर कमजोर करण्याचा प्रयत्न केला. तर हे घाणेरडे लोक आपल्या जिभेचा वापर करुन देशाला कमजोर करण्याचा प्रयत्न करतात,” असं जलील म्हणाले.
पुढे बोलताना ते म्हणाले, “अजमल कसाब नावाचा एक दहशतवादी होता ज्यानं आपल्या देशावर हल्ला केला होता. बंदुकीच्या जोरावर आपल्या देशाला कमकुवत करण्याचा उद्देश त्याचा होता. पण यांच्यासारखे म्हणजे (संभाजी भिडे) लोक बंदुकीचा वापर करत नाहीत. पण आपल्या जिभेचा वापर करतात. त्यांचा देखील उद्देश समाजात तेढ कशी निर्माण करता येईल हाच आहे”, असं जलील म्हणाले.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच संभाजी भिडे यांनी डॉक्टरांबद्दल अपशब्द वापरत खळबळजनक वक्तव्य केलं होतं. ‘जेवढा शिकलेला माणूस तेवढा तो गाढव. डॉक्टर नालायक आहेत, ते लुटारू आहेत. डॉक्टर ……खोर आहेत,’ असे वादग्रस्त वक्तव्य भिडे यांनी केले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांनी केलेल्या विधानाने खळबळ उडाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
संबंध ठेव नाहीतर संघातून काढेल म्हणत खेळाडूचे केले लैंगिक शोषण, अकोल्याच्या कोचला जन्मठेप
गुजरातप्रमाणे महाराष्ट्रातील शाळेत देखील भगवद्गीता शिकवली जावी; भाजपने केली मागणी
चुकूनही घरच्यांसमोर बघू नका ‘ही’ वेब सिरीज; बोल्डनेस आणि इंटिमेंट सीन्समुळे होईल तारांबळ
कोल्हापूरच्या राजकारणात मोठा ट्विस्ट; शिवसेनेचे राजेश क्षीरसागर झाले ‘नॉट रिचेबल’