आपली खुर्ची जाण्याच्या भीतीने, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांनी अविश्वास प्रस्तावाच्या एक दिवस आधी रविवारी इस्लामाबादमध्ये एक भव्य सभा घेतली. या रॅलीतून इम्रान खान यांनी विरोधी पक्षांवर निशाणा साधला. इम्रान यांनी आपल्या भाषणात भारतीय मुस्लिमांचाही उल्लेख केला. जाणून घ्या इम्रान असे काय म्हणाले.(Imran Khan mentioned Indian Muslims)
रविवारी इस्लामाबादच्या रॅलीत पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांनी रॅलीत पोहोचलेल्या लोकांचे आभार मानून भाषणाला सुरुवात केली. संकटाच्या वेळी माझ्या एका कॉलवर आल्याबद्दल धन्यवाद. ते पुढे म्हणाले की, तुम्हाला ज्या प्रकारे आमिष दाखवले होते, पैशाची ऑफर दिली होती, ते मला माहीत आहे. ज्याप्रमाणे तुमचा विवेक विकत घेण्याचा प्रत्येक प्रकारचा प्रयत्न केला गेला ते ही मला माहित आहे. माझ्या एका कॉलवर आल्याबद्दल मी पाकिस्तानच्या लोकांचे आभार मानतो, तुम्ही पाकिस्तानच्या कानाकोपऱ्यातून आला आहात. मला तुझा अभिमान आहे.
इम्रान खान यांनी इस्लामाबादच्या रॅलीत भारतीय मुस्लिमांचा उल्लेख केला. स्वातंत्र्यानंतरच्या पाकिस्तानचा संदर्भ देत इम्रान खान म्हणाले की, भारतात असलेल्या 20 कोटी मुस्लिमांनीही त्या पाकिस्तानसाठी मतदान केले होते. ते लोकही खऱ्या पाकिस्तानचे स्वप्न पाहत होते. आज मी ते स्वप्न पूर्ण करत आहे.
इम्रान खान म्हणाले, मी चीनमध्ये पाहिले की, गेल्या तीन वर्षांत चीनने त्यांच्या जनतेला कसे संकटातून बाहेर काढले. त्याचप्रमाणे मलाही आपल्या मुस्लिमांना गरिबीतून वर काढायचे आहे. आमचे सरकार गरिबांसाठी आले आहे. आम्ही 2 कोटी लोकांना रेशन देण्यासाठी आलो आहोत. आम्ही तरुणांना बळ देण्यासाठी आलो आहोत, आम्ही रोजगार देत आहोत. पाकिस्तान सरकारमध्ये पहिल्यांदाच असे घडले आहे.
इम्रान म्हणाले की, जेव्हा आमच्याकडे पैसा आला तेव्हा मी अडीचशे अब्ज सबसिडी देऊन पेट्रोलचे दर प्रतिलिटर 10 रुपये कमी केले आणि विजेचे दर प्रति युनिट 5 रुपये कमी केले. मला खात्री आहे की मी जसजसे पैसे गोळा करत जाईन तसतसे मी ते सर्व पैसे माझ्या समाजासाठी खर्च करेन. जेव्हा धाकटा चोरी करायचा तेव्हा त्याला तुरुंगात टाकायचे, पण मोठ्याने चोरी केली की त्याला देशाबाहेर पाठवायचे. ही स्थिती प्रत्येक देशाची कहाणी आहे. पण मी पाकिस्तानात हे होऊ देणार नाही.
इम्रान म्हणाले, पाकिस्तानचा नाश होत आहे, यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला आहे. पण मी तुम्हाला एक वास्तव सांगतो की, पाकिस्तानने साडेतीन वर्षात जी कामगिरी दिली आहे, तेवढी चांगली कामगिरी याआधी केली नाही. मी डिझेलचे दर 10 रुपयांनी कमी केले. 100 वर्षानंतर सर्वात वाईट वेळ होती कोरोनाकाळ. सारे जग थांबले. त्यावेळी हे लोक म्हणाले की ते पाकिस्तानला नष्ट करत आहे. पण आज मी अभिमानाने सांगतो की आम्ही उचललेल्या पावलांचे संपूर्ण जग कौतुक करत आहे. मी माझ्या गरीबांना वाचवले, देश वाचवला.
सध्या जागतिक बँकेने जगातील सर्वात कमी गरिब पाकिस्तानात असल्याचा अहवाल दिला आहे. पाकिस्तानच्या इतिहासात आम्ही सर्वाधिक कर वसूल केला. इम्रान यांनी हावभावांमध्ये विरोधकांवर निशाणा साधला. जनरल मुशर्रफ यांच्याप्रमाणे माझेही सरकार पाडले जावे, यासाठी हे सर्व नाटक घडत असल्याचे ते म्हणाले. ते मला पहिल्यापासून ब्लॅकमेल करत आहेत. आज आम्ही त्यांच्यासाठी कर्जाचा बोजा उचलत आहोत.
महत्वाच्या बातम्या-
स्टाईलिश लूक, जबरदस्त ऍब्स, शाहरुख खानने शेअर केला ‘पठाण’चा पहिला लूक; कॅप्शनने लोकांना लावले वेड
नाद केला भावा तू! परदेशातील नोकरीला लाथ मारून मायदेशी फुलवली शेती, आज लाखोंची उलाढाल
बॉलिवूडच्या फेमस जोडीत आला दुरावा; लग्नाची बोलणी सुरू असतानाच श्रद्धा कपूरचा झाला ब्रेकअप
ठाकरे सरकारला दणका! परमबीर सिंग प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय