Share

‘झुंड’ला मिळालेली ‘एवढी’ जबरदस्त रेटिंग पाहून अमिताभ बच्चनही झाले शॉक, म्हणाले, हे खूपच…

jhund

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन अभिनित ‘झुंड’ (Jhund) हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. चित्रपटाबाबत प्रेक्षक आणि समीक्षकांसोबत अनेक कलाकार आणि दिग्दर्शकांकडूनही चांगली प्रतिक्रिया मिळत आहे. बॉक्स ऑफिसवरही चित्रपटाची यशस्वी घौडदौड सुरु आहे. यादरम्यान आयएमडीबीने (Internet Movie Data Base) ‘झुंड’ या चित्रपटाला १० पैकी रेटिंग दिलं आहे. तर आयएमडीबीने दिलेलं रेटिंग पाहून अमिताभ बच्चन यांनी हे खूपच दुर्लभ असल्याचं म्हटलं आहे.

चित्रपटांना रेटिंग देणारी लोकप्रिय वेबसाईट आयएमडीबीने ‘झुंड’ या चित्रपटाला १० पैकी ९.३ रेटिंग दिलं आहे. अमिताभ बच्चन यांच्या एका चाहत्याने यासंदर्भात एक ट्विट शेअर करत त्यामध्ये अमिताभ यांना टॅग केले. तर अमिताभ बच्चन यांनी हे ट्विट रिट्विट करत ‘हे खूपच दुर्लभ आहे’, असल्याचे म्हटले. त्यानंतर अमिताभ यांच्या या ट्विटर अनेकजण कमेंट करत त्यांना शुभेच्छा देत आहेत. तसेच झुंड चित्रपटात त्यांनी उत्कृष्टपणे काम केल्याचे सांगत त्यांचे कौतुक करत आहेत.

दरम्यान, ‘झुंड’ हा चित्रपट नागपूरमधील निवृत्त क्रीडा प्रशिक्षक विजय बरसे यांच्या जीवनावर आधारित आहे. त्यांनी झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलांना फुटबॉलचे ट्रेनिंग देऊन त्यांना एक नवीन जीवन दिले. तर चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी विजय बरसे यांची भूमिका साकारली आहे. तसेच या चित्रपटात ‘सैराट’ फेम रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर मुख्य भूमिकेत आहेत.

यासोबतच या चित्रपट फुटबॉल खेळणाऱ्या मुलांच्या भूमिकेसाठी झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलांची निवड करण्यात आली. नागराज मंजुळे यांना वाटले की, जर चित्रपटातील पात्रांना योग्य न्याय द्यायचे असेल तशाप्रकारची मुलेच देऊ शकतात. परंतु, या चित्रपटातील अनेक कलाकार पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर आले होते. असे असतानाही नागराज मंजुळे यांनी उत्तमरित्या सर्वांकडून अभिनय करून घेतले.

या चित्रपटासंदर्भात एका मुलाखतीत बोलताना अमिताभ बच्चन यांनी एक किस्सा सांगितला. बॉलिवूड हंगामाशी बोलताना अमिताभ यांनी म्हटले की, ‘मला एक गोष्ट आठवते. एक सीन होता ज्यामध्ये सर्व मुलांच्या डोळ्यात पाणी येतं. त्या सीनपूर्वी एक मुलगा माझ्याजवळ आला आणि म्हणाला, सर कसं रडायचं?’

अमिताभ बच्चन यांनी पुढे म्हटले की, ‘त्या मुलाच्या बोलण्यात मोठा मतितार्थ दडलेला होता. तो मुलगा त्या टोकाला पोहोचलेला होता जिथे रडणे वगैरे सर्व काही मागे पडले होते. बहुधा तो त्याच्या आयुष्यात कधीच रडला नसेल. कारण तो अशा परिस्थितीत मोठा झाला होता जे इतके कठिण होते की तिथे केवळ रडत बसणे हा पर्याय नव्हता. तो क्षण दीर्घकाळपर्यंत माझ्या मनात राहून गेला’.

दरम्यान ‘झुंड’ चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर यशस्वी घौडदौड सुरु आहे. अवघ्या पाच दिवसात चित्रपटाने ९ कोटींचा गल्ला जमावला आहे. चित्रपटाने पहिल्या दिवशी १.५० कोटींची कमाई केली. त्यानंतर शनिवारी २.१० कोटी आणि रविवारी २.९० कोटी रूपयांचा व्यवसाय केला. त्यानंतर सोमवारी १.२० कोटी आणि मंगळवारी १.३० असे एकूण चित्रपटाने ९ कोटींचा व्यवसाय केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या :
‘झुंड’ चित्रपट पाहिल्यानंतर अनुराग कश्यपला अश्रु अनावर; म्हणाला, आतापर्यंत मी पाहिलेल्या चित्रपटांमध्ये..
PHOTO: एक लाजरा न साजरा मुखडा…; लाल रंगाच्या साडीत खुलुन आलं पाठकबाईंचं सौंदर्य, चाहते घायाळ
‘तेव्हा लोक मला म्हणायचे की, तु हिरोईनसारखी दिसत नाहीस’; माधुरीने जुन्या आठवणींना दिला उजाळा

बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now