Share

IMDb ने ‘द कश्मीर फाईल्स’ चित्रपटाचे घटवले रेटिंग; दिले ‘हे’ धक्कादायक कारण…

विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द कश्मीर फाईल्स’ या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. मात्र चित्रपटाला आयएमडीबी रेटिंगही १० पैकी १० होते. पहिल्याच वीकेंडमध्ये या चित्रपटाने २७.१५ कोटींचा व्यवसाय केला आहे.(IMDb downgrades ‘The Kashmir Files’ movie)

एकीकडे चित्रपटाला प्रचंड प्रेम मिळत आहे. तर दुसरीकडे IMDb ने मात्र चित्रपटाचे रेटिंग कमी केले आहे. ‘unusual voting activity’ चे कारण देत रेटिंग कमी करत असल्याचे स्पष्टीकरण IMDbने दिले आहे. अक्षय कुमार, कंगना राणावत, परिणीती चोप्रा, आर माधवन आणि परेश रावल अशा अनेक कलाकारांनी या चित्रपटाचे कौतुक केले आहे.

चित्रपटाला IMDb वर १० पैकी १० चं रेटिंग मिळणे फार दुर्मिळ गोष्ट आहे. IMDb चे रेटिंग अतिशय विश्वासार्ह मानले जाते. कारण ते प्रेक्षकांचे फीडबॅक आणि रेटिंगची सरासरी संख्या आहे. चित्रपटाला १० पैकी १० रेटिंग मिळणे दुर्मिळ असले तरी चित्रपटाला रेटिंग मिळाली आहे.

एका चाहत्याने ‘द काश्मीर फाईल्स’चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांना ट्विट टॅग करत लिहिले आहे की, #TheKashmirFilesचे IMDb पेजवर असे सांगण्यात येत आहे की, त्यांच्या रेटिंग यंत्रणेला ‘unusual voting activity’ दिसून आली आहे.

त्यांनी रेटिंग सिस्टमची विश्वासार्हता राखण्यासाठी, त्यावर पर्यायी गणना लागू केली आहे. चाहत्याने सांगितले की, IMDbने स्वतः चित्रपटाचे रेटिंग घटवले आहे. विवेक अग्निहोत्रींनी प्रतिक्रिया दिली आहे. या पेजने अहवालात म्हटले आहे की, या चित्रपटासाठी १३१, ४३३ मते मिळाली आहेत.

unusual voting activityमुळे या चित्रपटाला आता ८.३ रेट केले गेले आहे. यावर विवेक अग्निहोत्री यांनी लिहिले की, खर्‍या अर्थाने आता हे कृत्य असामान्य आणि अनैतिक आहे. काश्मिरी पंडितांवर झालेल्या अन्यायाची कथा मांडणाऱ्या या चित्रपटाला देशभरातून जोरदार प्रतिसाद मिळत आहे. अनेक कारणांमुळे हा चित्रपट चर्चेत राहिला आहे.

महत्वाच्या बातम्या
खनिज तेलासोबत अन्य वस्तू होणार स्वस्त? रशियाने भारताला दिली ‘ही’ मोठी ऑफर
करोडोंची संपत्ती, अलिशान आयु्ष्य तरी आमिर खानला वाटतेय ‘या’ गोष्टीची खंत; स्वतःच केला खुलासा

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now