Share

अदानींचं नशीब फळफळलं! कोट्यवधींचे नुकसान होऊनही ‘या’ कंपनीने पुन्हा केली हजारो कोटींची गुंतवणूक

Gautam Adani

भारतातील प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांना गेल्या दिवसांपासून धक्क्यावर धक्के बसत आहे. अमेरिकेतील रिसर्च कंपनी हिंडनबर्गने अदानी ग्रुप अनेक गंभीर आरोप केले होते. त्यामुळे त्यांच्या शेअर्सच्या किंमती मोठ्या प्रमाणात कोसळल्या आहे.

हिंडनबर्गने अदानी ग्रुपबद्दल एक अहवाल सादर केला होता. त्यामुळे त्यांच्या शेअर्सच्या किंमती खाली आल्या आहे. गेल्या काही दिवसांत गुंतवणूकदारांना हजारो कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. असे असताना आता एक हैराण करणारी बातमी समोर आली आहे.

अदानी ग्रुपमुळे गुंतवणूकदारांचे पैसे बुडत असतानाच अबु धाबीतील एका कंपनीने अदानी समुहामध्ये ४०० दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. ही गुंतवणूक आयएचसी या कंपनीने केली असून तिने एफपीओमध्ये गुंतवणूक केली आहे. त्यामुळे अदानी समुहासाठी ही मोठी आनंदाची बातमी आहे.

अदानी एंटरप्राईझेसकडून एफपीओच्या माध्यमातून ४५.५ दशलक्ष शेअर्सची ऑफर देण्यात आली होती. त्यापैकी १.३९ दशलक्ष शेअर्स विकत घेण्यात आले आहेत. अबुधाबीतील इंटरनॅशनल होल्डिंग कंपनीने आज अदानी समुहात ३ हजार २०० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा केली  आहे.

आयएचसीची उपकंपनी ग्रीन ट्रान्समिशन इनव्हेस्टमेंट होल्डिंग आरएसी लिमिटेडद्वारे ही गुंतवणूक करण्यात येणार आहे. आयएचसी ही अबुधाबीतील शेअर बाजारात लिस्टेड असलेल्या प्रमुख कंपन्यांपैकी एक असलेली कंपनी आहे. या कंपनीने आधी सुद्धा अदानी समुहात गुंतणूक केली आहे.

अदानी समुहावर आमचा पुर्णपणे विश्वास आहे. त्यामुळेच आम्ही या समुहात गुंतवणूक करत आहोत. दीर्घकालीन विकासाची क्षमता या कंपनीत आहे. त्यामुळे शेअर्स होल्डर्सला सुद्धा त्याचा फायदा होईल, असे त्या कंपनीचे सीईओ सईद बशर शोएब यांनी एका पत्रकार परिषदेत म्हटले आहे.

आयएचसीने दुसऱ्यांदा अदानी समुहात मोठी गुंतवणूक केली आहे. याआधी आयएचसीने अदानी समुहातील तीन कंपन्यांमध्ये दोन अब्ज अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक केली होती. आताच्या गुंतवणूकीबाबत बोलताना शोएब म्हणाले की, आमचं आंतरराष्ट्रीय बाजारावरही बारकाईने लक्ष आहे. आम्ही देशातील कंपन्यांसोबतच परदेशी कंपन्यांमध्येही गुंतवणूक करत आहोत.

महत्वाच्या बातम्या-
३ दिवसात ३ लाख कोटींची राख, हिंडेनबर्गने अदानींची दुनियाच हादरवली; श्रीमंतांच्या टॉप टेनमधून बाहेर
ब्राम्हण कुकीज आल्यामुळे संतापले ग्राहक; म्हणाले, या देशात नक्की…
लोकशाहीची व्याख्या सांगणाऱ्या चिमुरड्याची मन हेलावणारी कहाणी; ‘या’ गंभीर आजाराशी देतोय झुंज

ताज्या बातम्या राज्य

Join WhatsApp

Join Now