मराठा समाजाच्या हक्कासाठी लढणारे शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे यांचा अपघाती मृत्यू झाला. अनेक राजकीय नेत्यांनी या दुर्दैवी घटनेबाबत दुःख व्यक्त केले आहे. अशातच कोल्हापूरच्या संभाजीराजे छत्रपती यांनी देखील विनायक मेटे यांना श्रद्धांजली वाहत या घटनेबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ( while expressing grief, Sambhaji Raje rained down on the government)
विनायक मेटे यांच्या अपघाती निधनाची घटना अत्यंत दुर्दैवी असून या घटनेला केंद्र आणि राज्य सरकार जबाबदार असल्याचा गंभीर आरोप संभाजीराजे छत्रपती यांनी केला आहे. या प्रतिक्रियेमध्ये राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.
मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर मोठी रहदारी असते. आपत्कालीन परिस्थितीत अशी घटना घडली तर, दोन-तीन गाड्या त्या ठिकाणी असायला हव्यात. अशा अपघाती घटनेनंतर राज्य आणि केंद्र सरकारकडे आपत्कालीन सुविधा पोहोचवण्यासाठी कोणती नियमावली आहे? अशी विचारणा देखील यावेळी संभाजीराजेंनी केली.
संभाजीराजे पुढे म्हणाले की, ‘विनायक मेटे मराठा समाजाची शान आहेत. मराठवाड्याचे सुपुत्र आहेत. त्यांचे आमच्यातून निघून जाणे, आमच्यासाठी मोठा धक्का आहे. ही पोकळी कशी भरून निघणार, याचे उत्तर आत्ता आमच्याकडे नाही.’
‘विनायक मेटे हे बीडसारख्या ठिकाणाहून प्रतिकूल परिस्थितीतून पुढे आले. वारंवार मराठा समाजाच्या हितासाठी त्यांनी आपली बाजू प्रभावीपणे मांडली. मोठा बंधू म्हणून ते कायम माझा सल्ला घेत असायचे,’ असे संभाजीराजे यांनी सांगितले.
पुढे संभाजीराजे असेही म्हणाले की, ‘सरकारवर दबाव टाकायचा असेल तर आपण सर्वांनी एकत्र आले पाहिजे, असे विनायक मेटे नेहमी सांगायचे.’ याप्रसंगी विनायक मेटे यांच्या निधनावर दुःख व्यक्त करत संभाजीराजे यांनी राज्य व केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. याबाबत आता कोणत्या प्रतिक्रिया राजकीय वर्तुळात व्यक्त होतात, हे पहावे लागेल.
महत्वाच्या बातम्या-
तिरंगा लावण्यासाठी चढले छतावर, घराची कौलं फुटल्यामुळे ज्येष्ठ नागरिकाचा पडून मृत्यु
फडणवीसांचा मोठा खुलासा, विनायक मेटेंनी रात्री सव्वादोन वाजता केला होता मेसेज, म्हणाले..
मी जर तिसरा डोळा उघडला तर.., मंत्रिपदाची शपथ घेताच गुलाबराव पाटील विरोधकांवर बरसले






