युक्रेन आणि रशियामधील युद्ध सुरूच आहे. बलाढ्य रशियन सैन्याचे युक्रेनवर हल्ले सुरु आहेत. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी मोदी सरकारने ऑपरेशन गंगा सुरु केले आहे. मात्र अनेक विद्यार्थ्यांना मायदेशी परतताना अडचणीचा सामना करावा लागत आहे. या विद्यार्थ्यांनी त्याची व्यथा मांडली आहे.(If you want to go back to India)
युक्रेनमधून बाहेर पडताना किंवा बाहेर पडल्यावर किती हाल आणि अपेष्ट सोसाव्या लागतात याची आपबिती विद्यार्थ्यांनी सांगितली. आम्ही खूप वेळा भारतीय दुतवासातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र फोनला आणि मेसेजला कोणीही उत्तर दिले नाही. अशा शब्दात बिहारच्या सहारसमध्ये राहणाऱ्या प्रतिभानं तिला आलेला भीषण अनुभव सांगितला आहे.
आम्हाला होत असलेला त्रास आमच्या एका मैत्रिणीने व्हिडीओच्या माध्यमातून मांडला आहे. त्यानंतर लगेचच दूतवासला फोन आला आणि लगेचच व्हिडीओ डिलीट करायला सांगितला, असं प्रतिभाने सांगितलं आहे. अडकलेल्या विद्यार्थ्यांना मायदेशी घेऊन येण्याच्या ऐवजी सरकार प्रचार करण्यात मग्न आहे. प्रतिभा विनिस्तीया वैदकीय महाविद्यालयात चौथ्या वर्षाला आहे.
‘युद्ध सुरु झाल्यानंतर दोन दिवस आम्ही वाट पहिली दूतवासातून कोणतीच मदत मिळत नसल्यामुळे २६ फेब्रुवारीला आम्ही बस बुक केली. एका विद्यार्थ्याकडून ६ हजार रुपये घेतले. यामध्ये दुतवास आणि कर्मचारी यांचा हात असावा, असा संशय आम्हाला वाटतो असे, प्रतिभा म्हणते. बसमधून १४ तास प्रवास करून आम्ही रोमिनियाच्या सीमेवर पोहचलो. सीमेवर भारतीय दुतवासातील कोणीही उपस्थित नव्हतं.
रोमिनियाच्या लोकांनी आम्हाला मदत केली, थांबायला जागा दिली. पोटभर जेवण दिले. रोमिनियामध्ये आम्हाला भारतीय दुतवास भेटले. त्यांनी आमच्याशी गैरवर्तन केले. जो बाथरूम स्वच्छ करेल त्याला आधी भारतात पाठवले जाणार आणि बाकीच्यांना नंतर जाऊ दिले जाणार, असे आम्हाला सांगण्यात आले. अशा शब्दात प्रतिभाने धक्कादायक प्रकार सांगितला.
प्रत्येक विद्यार्थी दमलेला होता. चार दिवस बर्फात घालवले त्यामुळे बाथरूम धुण्याचा त्राण कोणाच्याही अंगात नव्हता. मात्र घरी जायचे असल्यामुळे काही विद्यार्थी टॉयलेट धुण्यासाठी गेले. भारतीय दुतवासाचे कर्मचारी हे सगळं पाहत होते. मात्र त्यांनी काहीच केले नाही, अशा शब्दात प्रतिभाने स्वतःची आपबिती मांडली.
महत्वाच्या बातम्या
अजय देवगण नाही तर या अभिनेत्यावर वेड्यासारखी प्रेम करायची काजोल, एक झलक पाहण्यासाठी मारायची फेऱ्या
VIDEO: शेन वॉर्नसारख्या मित्राला गमावल्यानंतर ढसाढसा रडला रिकी पॉन्टिंग, म्हणाला, गेल्या काही दिवसांत..