देशात दरवर्षी कॅन्सरचे प्रमाण जास्त वाढत आहे. हल्ली शाळेतील मुलांनाही सीगारेटचे व्यसन लागत आहे. पानशॉप सबंधित दुकानदारांनी सीगारेट ओढू नये असा बोर्ड लावला पाहिजे. दुकानाजवळ उभे राहून सीगारेट ओढणाऱ्या लोकांना दुकानदारांनी मनाई केली पाहिजे.(If you smoke a cigarette, you will go straight to jail)
तसेच दुसरीकडे बेकायदेशीररित्या सीगारेट आणि अन्य तंबाखूजन्य पदार्थ परराज्यातून घेऊन येणाऱ्या विरोधात एफडीएकडून कारवाई करण्यात येईल. अनेक किराणा दुकानातही सीगारेट तसेच तंबाखूजन्य पदार्थांची विक्री केली जाते.
त्यासोबत शाळेच्या बाजूला असणाऱ्या टपऱ्यांमध्येही सीगारेट आणि तंबाखूजन्य पदार्थांची विक्री केली जाते.
सीगारेट आणि तंबाखूजन्य उत्पादने अधिनियम २००३ हा केंद्र सरकारचा कायदा आहे.
५ कलमांपैकी कलम ४ नुसार सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करणे गुन्हा आहे. कोणत्याही शालेय संस्थेच्या १०० किलोमीटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थ विकण्यास मनाई आहे.
या कायद्यानुसार २०० रुपये चलन पावती दंड किंवा बाल न्याय कायदा २०१५ नुसार १ लाख रुपये दंड, ७ वर्षाच्या शिक्षेची तरतूद आहे. २०१२ साली आरोग्यासाठी हानिकारक असलेल्या गुटख्यासह अन्य उत्पादनावर एफडीएने बंदी आणली होती.
त्यानंतर मुंबई, मध्यप्रदेश तसेच कर्नाटक येथून माल आणण्याचे विविध मार्ग आहेत. त्या मार्गावर एफडीएने बंदी आणण्याचा प्रयत्नही केला होता.
महत्वाच्या बातम्या
लता मंगेशकर यांच्या निधनानंतर अंकिता लोखंडेचं उथळ वागणं पाहून युजर्स खवळले, पहा ‘तो’ व्हिडिओ
दूध पिणारं बाळ क्षणात रक्तानं माखलं; हृदय पिळवटून टाकणारी घटना वाचून डोळ्यात पाणी येईल