Share

रस्त्यावर चुकीच्या ठिकाणी गाडी दिसली तर फोटो पाठवा अन् बक्षीस मिळवा, गडकरींची घोषणा

अनेक ठिकाणी रस्त्यावर चुकीच्या पद्धतीने गाडी पार्क केल्यामुळे वाहतूक कोंडी होताना दिसते. या समस्येवर आता केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी महत्वाची घोषणा केली आहे. रस्त्यावर चुकीच्या पद्धतीने गाडी पार्क केली असेल तर तो फोटो पाठवा आणि ५०० रूपये मिळवा अशी त्यांनी घोषणा केली आहे.

दिल्लीतल्या इंडस्ट्रीयल डीकार्बनायझेशन समिट या कार्यक्रमात नितीन गडकरींनी ही घोषणा केली आहे. यावेळी म्हणाले, आपल्याकडे देशातल्या अनेक शहरांतील लोकांमध्ये कार पार्किंगबाबत अजिबात शिस्त नाही. पार्किंगची शिस्त न पाळता हवी तशी गाडी पार्क करतात.

अनेक लोक आपल्या पार्किंगची सोय करत नाहीत त्याऐवजी कार रस्त्यावर उभी करतात. कार पार्किंगची योग्य ती शिस्त पाळत नाहीत, केंद्र सरकारने हा कायदा लागू केल्यानंतर रस्त्यावरची वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल असं नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे.

तसेच म्हणाले, मोकळी जागा मिळाली की करा पार्किंग असा लोकांचा कल दिसतो. त्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक गोंडीची समस्या होताना दिसते. अशा प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी आता कायदा आणण्यासाठी आमचा विचार सुरू आहे, असे गडकरी यावेळी म्हणाले. चुकीच्या पद्धतीने गाडी पार्क केल्यानंतर आकारण्यात येणाऱ्या दंडाबद्दल देखील त्यांनी माहिती दिली.

नितीन गडकरी म्हणाले, जो कुणी व्यक्ती चुकीच्या पद्धतीने पार्किंग करेल त्याला १००० रूपये दंड आकारण्यात येईल. त्याचवेळी त्या गाडीचा फोटो काढून पाठवणाऱ्याला ५०० रूपये बक्षीस देण्यात येतील. माझ्या आचाऱ्याकडे दोन सेकंडहँड गाड्या आहेत. चार लोकांच्या कुटुंबाकडे सहा कार आहेत. त्या तुलनेत दिल्लीतले नागरिक सुखी आहेत.

नितीन गडकरी यांनी केलेली घोषणा महत्वाची असल्याच्या आता प्रतिक्रिया येत आहेत. वाहतूक गोंडीमुळे त्रस्त नागरिकांनी यासाठी सकारात्मकता दर्शवली आहे. चुकीच्या पद्धतीने गाडी पार्क केल्यानंतर जे लोक गाडीचा फोटो काढून पाठवतील त्यांना ५०० रुपये बक्षीस दिले जाणार ही योजना देखील अनेकांना आवडली आहे.

राज्य

Join WhatsApp

Join Now