Share

‘महाराष्ट्रात राहता तर मराठी यायला पाहिजे’; पत्रकाराने उर्फी जावेदचा केला पाणउतारा

प्रसिद्ध अभिनेत्री उर्फी जावेद नेहमीच तिने परिधान केलेल्या कपड्यांमुळे चर्चेत असते. तिचा नुकताच समुद्र किनारी काढलेला व्हिडीओ प्रचंड चर्चेत आला होता. आता ती चर्चेत येण्याचे कारण मात्र तिचे कपडे नसून, तिला एका पत्रकाराने मराठी भाषेवरून सुनावलं आहे, सध्या हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे.

उर्फी जावेद आपल्या अतरंगी कपड्यामुळे सोशल मीडियावर कायम चर्चेत असते. ती नेहमीच वेगवेगळ्या प्रकाराचे कपडे घालून सोशल मीडियावर टाकत असते. तिचे फोटो आणि व्हिडीओ पाहून चाहते घायाळ होतात. तिचे सोशल मीडियावर भरपूर फॉलोअर्स आहेत.

सध्या ती चर्चेत आली आहे, कारण तिने एका कार्यक्रमात हजेरी लावली असताना तिला मराठी बोलण्याबद्दल एका पत्रकाराने प्रश्न विचारला होता. त्यानंतर तिने आपल्याला मराठी येत नाही असं उत्तर दिलं आहे. पत्रकाराने ज्या पद्धतीने उर्फी जावेदशी संवाद साधला ते ऐकून तुम्हांला देखील नवल वाटेल.

झालेली घटना सविस्तर म्हणजे, एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमादरम्यान, उर्फी जावेदला एका पत्रकाराने मराठीत प्रश्न केला. त्यावर उर्फी म्हणाली मला मराठी येत नाही, थोडी थोडी समजते. यावर पत्रकार म्हणाला, महाराष्ट्रात राहून मराठी येत नाही, शिकून घ्या. महाराष्ट्रात राहत आहात तर मराठी यायला पाहिजे.

पत्रकाराच्या या बोलण्यावर उर्फी जावेदला देखील धक्का बसला. ती पत्रकाराला म्हणाली असे का, यानंतर पत्रकार आणि उर्फी यांच्यात थोडा वाद- प्रतिवाद झाला. यावर इतर उपस्थित पत्रकार म्हणाले, भांडण करू नका. तर उर्फी जावेद म्हणाली मी भांडण करत नाही.

दरम्यान, या वेळी तिने काचेचा ड्रेस घातला होता. उर्फी जावेद ही एक बॉलिवूड अभिनेत्री आहे. ती ‘बडे भैय्या की दुल्हनिया’ मध्ये ‘अवनी’, ‘मेरी दुर्गा’ मध्ये ‘आरती’ आणि ‘बेपनाह’ मध्ये ‘बेला’ अशा भूमिकांमधून पुढे आली आहे. तिच्या कपड्यांमुळे आज भले तिला कितीही लोकं नाव ठेवत असतील तरी सोशल मीडियावर तिचा व्हिडीओ पडला रे पडला की पाहण्यासाठी झुंबड उडवणारे काही कमी नाहीत.

मनोरंजन

Join WhatsApp

Join Now