आजकाल ज्या प्रकारे जग डिजिटल होत आहे, त्याच पद्धतीने लोक टीव्ही आणि सिनेमापेक्षा ओटीटी प्लॅटफॉर्मला (OTT platform) जास्त महत्त्व देऊ लागले आहेत. कोरोना महामारीपासून, मोठ्या प्रमाणात प्रेक्षक ओटीटीकडे वळले आहेत. या प्लॅटफॉर्मवरील उत्तम सामग्री आता लोकांना आकर्षित करत आहे. यामुळेच आता मोठे स्टार्सही डिजिटलमध्ये रस दाखवत आहेत.(OTT Platform, Crime Thriller, Web Series)
सध्या, या OTT प्लॅटफॉर्मवर विविध प्रकारांच्या अनेक वेब सिरीज उपलब्ध आहेत ज्या लोक त्यांच्या आवडीनुसार पाहू शकतात. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला क्राईम थ्रिलर वेब सीरिज पाहण्याची आवड असेल तर आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, कोणती सीरीज पाहून तुम्ही तुमचे मनोरंजन करू शकता.
आश्रम ३
बॉबी देओल स्टारर आश्रम ३ सीरीज नुकतीच एमएक्स प्लेयरवर रिलीज झाली आहे. चांगली गोष्ट म्हणजे ही वेब सिरीज मोफत स्ट्रीम करता येते. प्रकाश झा दिग्दर्शित या सीरीजची प्रेक्षक खूप दिवसांपासून वाट पाहत होते. ३ जून रोजी प्रदर्शित होणारी ही वेबसिरीज अनेकजणांनी बघितली नसेल तर आज ही वेबसिरीज पाहून तुम्ही तुमचे मनोरंजन करू शकता.
जुनून
जुनून ही MX Player वरील क्राईम थ्रिलर वेब सिरीज आहे ज्याची कथा चांदनी साहा आणि अर्जुन चक्रवर्ती यांच्याभोवती फिरते. या वेब सिरीजमध्ये ७ एपिसोड्स आहेत, ज्याचा तुम्हाला अजिबात कंटाळा येणार नाही. ही वेब सीरिज २०२० मध्ये रिलीज झाली होती. मूलतः ती बंगाली भाषेत बनवली गेली होती परंतु त्याचा हिंदी डब MX Player वर पूर्णपणे विनामूल्य पाहता येईल.
पाप
जर तुम्हाला मिस्ट्री थ्रिलर पाहण्याची आवड असेल तर तुम्ही ही वेब सिरीज पाहू शकता. या सीरीजमध्ये पूजा बॅनर्जी, राहुल बॅनर्जी, रजत गांगुली, सोनाली दास गुप्ता, प्रियांका मंडल यांनी महत्त्वाची भूमिका साकारली आहे. आतापर्यंत या शोचे दोन सीझन आले आहेत. Hoichoi वर रिलीज झालेली ही बंगाली वेब सिरीज MX Player वर हिंदीमध्ये देखील उपलब्ध आहे.
डेंजरस
बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बसूने या सीरीजद्वारे डिजिटल डेब्यू केला. विक्रम भट्ट यांनी लिहिलेली ही क्राईम थ्रिलर वेब सिरीज आहे. या सीरीजचे दिग्दर्शन भूषण पटेल यांनी केले आहे. सीरीजची कथा तुम्हाला शेवटपर्यंत खिळवून ठेवेल. गुन्हेगार नेमका कोण आहे हे तुम्हाला कधीच कळणार नाही. तुम्ही ही सीरीज MX Player वर मोफत देखील पाहू शकता.
महत्वाच्या बातम्या-
मैंने प्यार किया फेम भाग्यश्रीच्या मुलीचेही अभिनय क्षेत्रात पदार्पण; या सीरीजद्वारे येणार प्रेक्षकांच्या भेटीला
त्यावेळी मला लुजमोशन अन् उलट्या व्हायच्या कारण.., प्राजक्ता माळीच्या वक्तव्याने चाहतेही हैराण
प्रचंड वादानंतरही प्राजक्ता माळी म्हणते ‘रानबाजारमधील ‘तो’ सीन माझ्या कारर्किदीतला बेस्ट’
OTT वर बोल्ड सिन्स देऊन या अभिनेत्रींनी उडवून दिली खळबळ, एकीने तर सगळ्यांना टाकलं मागे