आपण रातोरात कोट्याधीश व्हावे, अशी प्रत्येकाची इच्छा असते. पण हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात आणि कठोर परिश्रम आणि समर्पण करावे लागते. मात्र आता आम्ही तुम्हाला असा मार्ग सांगणार आहोत ज्यामुळे तुम्ही तुमची करोडपती होण्याची स्वप्न लवकरच पूर्ण करू शकता.
तुम्हांला करोडपती व्हायचे आहे, तर त्यासाठी तुमच्याकडे ‘या’ तीन नोटा असणं आवश्यक आहे. या द्वारे तुम्ही सहज आणि कोणतेही कष्ट न करता करोडपती होऊ शकता. आम्ही तुम्हांला जो मार्ग सांगणार आहोत तो ऐकून तुम्ही देखील हैराण व्हाल आणि आनंदाने उडया माराल हे नक्की.
काही लोकांना जुनी नाणी, नोटा जमा करणे आणि त्यांचा संग्रह करणे खूप आवडते, सध्या त्याच जुन्या नोटा आणि नाणी खूप मौल्यवान बनल्या आहेत. त्यांची विक्री करून तुम्ही भरपूर पैसे कमवाल. तुम्ही विचार करत असाल की हे केल्याने करोडपती कसं होईल? तर आम्ही तुम्हांला त्याबद्दल सविस्तर माहिती सांगतो.
जर तुमच्याकडे ‘ही’ एक रुपयाची नोट असेल, ज्यामध्ये काही महत्त्वाची चिन्हे असतील, या नोटेवर 1957 मध्ये राज्यपाल एचएम पटेल यांची स्वाक्षरी असेल, तसेच नोटेचा अनुक्रमांक 123456 असेल, अशी माहिती असणारी नोट तुमच्याकडे असेल तर तुम्ही ती कॉईनबाजारच्या वेबसाइटवर विकू शकता. ज्यातून तुम्हाला 1 लाख रुपयांपर्यंत पैसे मिळू शकतात.
तसेच जर तुमच्याकडे ही जुनी 5 रुपयांची नोट असेल तर तुम्ही तीची घरबसल्या विक्री करून भरपूर पैसे कमवू शकता. मात्र या 5 रुपयांच्या नोटेवर ट्रॅक्टर बनलेला असावा. सोबतच त्यावर 786 क्रमांक असावा. ही नोट ऑनलाइन विकून तुम्ही 1 लाख रुपयांपर्यंत कमाई करू शकता.
तिसरी म्हणजे, तुमच्याकडे ही 10 रुपयांची जुनी नोट असावी. या नोटेवर भारतीय सीडी देशमुख यांची स्वाक्षरी असावी. तसेच या नोटेच्या एका बाजूला अशोक स्तंभ असून दुसऱ्या बाजूला बोट बनलेली असावी. या नोटेच्या उलट बाजूस दोन्ही बाजूला इंग्रजीत 10 रुपये लिहिलेले असावे. अशी नोट तुमच्याकडे असेल तर, या नोटेपासून तुम्ही 20 ते 25 हजार रुपये कमवू शकता.
तुमच्याकडे यापैकी कोणतीही नोट असल्यास, तुम्ही ती Quikr या जाहिरात प्लॅटफॉर्मवर ऑनलाइन विकू शकता. वेबसाइटवर या दुर्मिळ नोटसाठी खरेदीदार मोठे पैसे मोजत आहेत. त्यामुळे कोणताही उशीर न करता झटपट तुमच्याकडे असणारा जुन्या नोटांचा संग्रह तपासा, आणि त्यात या नोटा शोधा.
या जुन्या नोटा विकण्यासाठी, तुम्ही प्रथम Quikr वर विक्रेता म्हणून स्वतःची नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यानंतर तुम्हाला नोटचा फोटो क्लिक करून अपलोड करावा लागेल. ही प्रक्रिया करण्याआधी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी टाकावा लागेल. वेबसाइट तुम्ही दिलेल्या माहितीची पडताळणी करेल. ज्याला खरेदी करायची आहे ते तुमच्याशी संपर्क साधतील.