Share

शिवसेनेच्या वाटेला गेलात तर वाघाची नखं अजूनही धारधार आहेत हे लक्षात ठेवा; बच्चू कडूंचा राणा दाम्पत्याला इशारा

मनसे नेते राज ठाकरे यांनी महाराष्ट्र सरकारला ३ मेपर्यंत मशिदींवरील भोंगे उतरवण्याचा अल्टिमेटम दिला आहे. परंतु असे काही करण्याबाबत आघाडी सरकारच्या नेत्यांनी विरोध दर्शविला आहे. त्यानंतर आता थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानासमोर हनुमान चालिसा पठण करणार असल्याचा इशारा खासदार नवनीत राणा यांनी दिला आहे.

यावरून राज्यमंत्री बच्चू कडू यांनीही नवनीत राणांवर टीका केली आहे. एबीपी माझाशी बोलताना, “खरं तर हा अतिशय मूर्खपणा आहे. कोणते मुद्दे घ्यावेत याचं कोणतंही भान राणांना राहिलेलं दिसत नाही. प्रसिद्धीच्या झोतात येण्यासाठी हा सगळा प्रकार सुरु आहे. शिवसेनेने जे आव्हान दिलं आहे त्यामध्ये आम्हीदेखील त्यांच्यासोबत आहोत. प्रहारचे कार्यकर्ते त्यांच्यासोबत असतील,” असा इशारा बच्चू कडूंनी दिला आहे.

त्याचबरोबर, “ज्या विचारधारेवर निवडून आले ती कायम ठेवली नाही उलट त्यावर आक्रमण करत आहेत. शिवसेनेच्या, उद्धव ठाकरेंच्या वाटेला गेलात तर काय होईल सांगता येणार नाही. वाघाची नखं अजूनही धारदार आहेत हे त्यांनी लक्षात ठेवावं,”असे बच्चू कडू यांनी नवनीत राणांवर टीका करत म्हणले आहे.

इतकेच नव्हे तर, “या जिल्ह्याचे ते खासदार, आमदार आहेत. त्यांचा अपमान होऊ नये असं आम्हाला वाटतं. सामान्य माणसाशी संबंध नसलेले मुद्दे घेऊन आपला अपमान कऱण्याच्या सोयीने ते जात आहेत. उलट निवडून येताना राष्ट्रवादीचा पाठिंबा घेतला आणि आता वेगळ्या विचारधारेचा पाठिंबा घेत आहेत. ही मतदारासोबत फार मोठी बेईमानी आहे,” अशी टीका यावेळी त्यांनी केली आहे.

दरम्यान राज्यात सुरू असलेल्या भोंग्याच्या वादावरून खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला होता. यावेळी त्यांनी, येत्या २३ तारखेला मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर हनुमान चालिसा पठण करण्याचा निर्धार केला होता. यावरूनच आता राणा दाम्पत्यावर विरोधी पक्षनेते टीका करताना दिसत आहेत.

महत्वाच्या बातम्या
‘राज ठाकरे तेव्हा बोलायचे तर गुदगुल्या व्हायच्या, आता सत्य बोलतात तर खाजवायला होतंय’
इलेक्ट्रीक वाहनांना आग लागण्याच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ! संतापलेल्या गडकरींनी कंपन्यांना दिला ‘हा’ इशारा
मशिदीच्या नूतनीकरणादरम्यान सापडले हिंदू मंदिरासारखे अवशेष, विश्व हिंदू परिषदेच्या नेत्यांनी केलं ‘हे’ आवाहन
वादावर टाकला पडदा! माफी न मागता अमोल मिटकरींनी संस्कृतच्या ‘या’ तीन शब्दातून स्पष्टच सांगितलं, म्हणाले..

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now