सतत होणारे अपघात आणि चालक मोडत असलेले नियम बघता नवीन मोटार वाहन कायदा लागू करण्यात आला आहे. या कायद्यातील नियम कठोरपणे पाळणे सर्वांनाच बंधनकारक केले आहे. मुख्य म्हणजे या कागद्यातंर्गत वैध लायसन्स, आरसी आणि विमा नसेल तर चांगलाच दंड आकारला जाणार आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, जर तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्सची मुदत संपल्यानंतर ड्रायव्हिंग लायसन्सच्या नूतनीकरणासाठी अर्ज केला तर तुम्हाला १००० रुपये दंड भरावा लागणार आहे. इतकेच नव्हे तर, जर तुम्ही हे काम एक वर्षे पुढे ढकलले तर दरवर्षी तुम्हाला 1 हजार रुपयांचा दंड भरावा लागणार आहे.
प्रत्येक वर्षाच्या आधारे दंडामध्ये दरवर्षी १ हजार रुपये जोडले जातील. याची नुकसान भरपाई करणे चालकाला जड जाणार आहे. हा कायदा लागू होण्यापूर्वी आरटीओमध्ये परवान्याचे नूतनीकरण करण्यासाठी केवळ ४७४ रुपये मोजावे लागत होते. यामध्ये परवाना नूतनीकरणासाठी २०० रुपये, आरटीओसाठी २०० रुपये आणि स्मार्टचिप कंपनीला ७४ रुपये शुल्क देण्यात येत असत.
तसेच एक वर्ष विलंब केल्यास ३०० रुपये आणि दोन वर्षांच्या विलंबासाठी १०७४ रुपये भरावे लागत होते. परंतु आता या दंडात चांगलीच वाढ करण्यात आली आहे. चालक जबाबदारीने या सर्व गोष्टींकडे लक्ष देत नसल्यामुळे दंड दुप्पट करण्यात आला आहे.
केंद्र सरकारने चालकांसाठी ड्रायव्हिंग लायसन्स, आरसी आणि वाहन विमा यासह इतर महत्त्वाची कागदपत्रे ऑनलाइन सुरक्षित ठेवण्यासाठी डिजी लॉकरची सुविधा दिली आहे. या सुविधेतंर्गत चालक कोणतेही शुल्क न भरता आपली कागदपत्रे व्यवस्थित सुरक्षित ठेवू शकतो. जर काही ठिकाणी कागदपत्रे दाखवण्याची गरज पडली तर तो लॉकर ओपन करून दाखवू शकतो.
जर तुम्हाला डिजी लॉकरमध्ये खाते उघडायचे असेल तर तुम्ही सरकारी वेबसाइट digilocker.gov.in वर जाऊन Signup Option वर क्लिक करा. त्यानंतर नाव, जन्मतारीख, ईमेल आयडी इत्यादी सर्व आवश्यक माहिती तिथे जमा करा. पुढे तुमचा तयार केलेला पासवर्ड टाका.
यानंतर जो OTP येईल तो टाकून तुमचे खाते उघडा. यानंतर तुम्ही तुमचे युजरनेम आणि पासवर्ड तयार करून कधी ही गरज पडल्यास लॉग इन करू शकता. एखाद्या वेळेस जर तुमची कागदपत्रे जवळ नसतील तर तुम्ही लॉकरमधील कागदपत्रे लॉगीन करुन दाखवू शकता.
महत्वाच्या बातम्या
ईडीचा राजीनामा देऊन उत्तरप्रदेशच्या निवडणूकीत उतरलेल्या अधिकाऱ्याचं काय झालं? वाचा..
‘या’ पाच अभिनेत्रींंसोबत जोडले गेले होते श्रीसंतचे नाव, पाच नंबरवालीचं नाव वाचाल तर अवाक व्हाल
‘कौन प्रवीण तांबे?’ चा ट्रेलर झाला प्रदर्शित; श्रेयस तळपदे दिसला नव्या भूमिकेत, पहा व्हिडीओ
PHOTO : राधिकाच्या खऱ्या आयुष्यातील पतीसमोर गुरूनाथही पडेल फिका, वाचा त्यांची भन्नाट लव्हस्टोरी