Share

हिंमत असेल तर महापौराची निवड जनतेतून करा, पुण्याचा पुढचा महापौर मनसेचाच असेल – वसंत मोरे

vasant more

‘सोयीनुसार प्रभाग रचना बदलली जात आहे. कितीही फोडा जोडा तरी आमची लढायची तयारी आहे. पुण्याचा पुढचा महापौर मनसेचाच असेल. हिंमत असेल तर निवडणुकांना सामोरे जा. महापौराची निवड जनतेतून करा,’ असे आवाहन पुण्याचे मनसे नेते वसंत मोरे यांनी केले आहे. (If you dare, choose the mayor from the people, the next mayor of Pune will be from MNS – Vasant More)

एकीकडे राज्यस्तरावर मनसे आणि भाजपा यांची जवळीक वाढत असल्याची चिन्हे आहेत तर, दुसरीकडे स्थानिक स्तरावर मात्र मनसे नेत्याने सरकारला थेट चॅलेंज केल्याचे दिसते. वसंत मोरे यांच्या अशा रोखठोक विधानामुळे कार्यकर्त्यांमध्ये याची चांगलीच चर्चा रंगली आहे.

महविकास आघाडीचे सरकार असताना तीन सदस्य प्रभाग रचना करण्यात आली. त्यानुसार मतदार यादया तयार झाल्या. मतदान केंद्रांची पाहणी करण्यात आली. परंतु आता शिंदे सरकार सत्तेवर आल्याने त्यांनी पुन्हा जुन्या पद्धतीने चार सदस्य प्रभागरचना करण्याचा घाट घातला आहे.

महाविकास आघाडीने फेब्रुवारीमध्येच महानगरपालिकेच्या निवडणुका घ्यायला हव्या होत्या. आता तर आरक्षण पण जाहीर झाले मग आता का घाबरताय? हिंमत असेल तर निवडणूक लढवा, महापौर जनतेतून निवडा. तो महापौर मनसेचाच असेल, असा विश्वास वसंत मोरे यांनी व्यक्त केला.

२०१७ प्रभाग रचनेनुसार महानगरपालिका निवडणुका घेण्यात येतील, असा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत नुकतीच घेण्यात आला. तसेच महाविकास आघाडीने वाढवलेली वॉर्ड संख्या नियमबाह्य असल्याचा दावा शिंदे सरकारने केला आहे.

२०१२ मध्ये २९ नगरसेवक एवढे मोठे संख्याबळ मनसे पक्षाचे पुणे महानगरपालिकेमध्ये होते. मात्र त्यानंतरच्या निवडणुकीत हीच संख्या २ नगरसेवकांवर आली. आता मात्र पक्षामध्ये विविध सभा, बैठका यामुळे नवी ऊर्जा निर्माण झाल्याने याचा कितपत फायदा येत्या निवडणुकीत पक्षाला होणार? हे येत्या काळात स्पष्ट होईल.

महत्वाच्या बातम्या-
दीपक केसरकरांनी सांगितलं मुख्यमंत्री शिंदेंच्या आजारपणामागंच खरं कारण; म्हणाले..
उद्धव ठाकरे मोदींसोबत जाण्यास तयार होते पण राणेंमुळे…; केसरकरांचा मोठा गौप्यस्फोट
Election: आमदाराला त्याच्याच साध्या कार्यकर्त्याने धोबीपछाड देत जिंकली निवडणूक; केला सुपडा साफ

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now