मराठी अभिनेते किरण माने यांनी पंतप्रधान मोदी आणि मोदी भक्तांबाबत जेव्हा पोस्ट केली तेव्हापासून ते चर्चेत आले आहेत. त्यानंतर त्यांना मालिकेमधून बाहेर देखील काढले गेले. यावर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. मात्र, किरण माने यांच्यावर अन्याय होत आहे, त्यांना अशा प्रकारे मालिकेमधून काढले जाऊ नाही यासाठी अनेक महिला कलाकार समोर आल्या. त्या सर्वांचे आभार किरण माने यांनी पोस्ट करून मानले आहेत.
पंतप्रधान मोदी यांना सुरक्षिततेच्या कारणामुळे पंजाब दौरा रद्द करावा लागला आणि दिल्लीत परतावे लागले. यावर किरण माने यांनी फेसबुक पोस्ट करत मोदी आणि मोदी भक्त यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली. दरम्यान, त्यांना कार्यकर्त्यांच्या अनेक धमक्या आल्या. मात्र त्यांनी वेळोवेळी त्याबद्दल पोस्ट टाकत प्रतिक्रिया दिल्या.
मात्र, काही दिवसांनी त्यांना ‘मुलगी झाली हो’ या मराठी मालिकेतून अचानक काढले गेले. दरम्यान, आपण राजकीय भूमिका घेत असल्यामुळे आपल्याला मालिकेतून काढून टाकण्यात आलं असा आरोप किरण माने यांनी केला होता. त्यानंतर या प्रकरणावर महाराष्ट्रभर पडसाद उमटत आहेत. शिवाय अनेक कलाकार आणि नेते मंडळी माने यांना खंबीर पाठिंबा देताना दिसत आहेत.
काहींनी मात्र माने यांच्यावर आरोप केले आहेत. माने यांची सेटवरील वागणूक ठीक नाही, स्त्रीयांसोबतच त्यांची वागणूक चांगली नाही म्ह्णून मालिकेमधून काढले असा आरोप करणारा देखील एक गट आहे. त्यामुळे सध्या नेमकं किरण माने यांना त्यांच्या राजकिय पोस्टमुळे बाहेर काढले की वेगळ्या कारणामुळे असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.
त्यात किरण माने यांनी नवीन पोस्ट टाकत त्यांना पाठिंबा देणाऱ्या महिला कलाकारांचे आभार मानले आहेत. त्यांनी पोस्ट करून लिहिलं की, मला पाठिंबा देत आहात तर विचार करा, यात खूप रिस्क आहे. प्रोडक्शन हाऊस नाराज होणं आपल्या क्षेत्राला परवडणारं नसतं. त्यावर महिलांनी “आज आम्ही तुमच्या बाजूने उभं राहिलो नाही तर आम्हांला झोप येणार नाही, आम्हांला झोप महत्वाची आहे” अशी प्रतिक्रिया दिली.
https://www.facebook.com/1460418198/posts/10224632820235517/?d=n
बऱ्याच जणांना वाटतं मी ब्राम्हण द्वेष्टा आहे. मात्र, तसे नाही. माझ्या जवळचे लोक तुम्हांला सांगतील मी जातवर्चस्ववाद्यांचा तिरस्कार करतो. मी कुठल्या जातीचा नाही. माझ्या पोस्ट मध्ये चिन्मय -तन्मय दिसले की हे जातवर्चस्ववादी ओरडतात की,”बघा हा ब्राम्हण द्वेष करतो.” पण त्याच पोस्ट मध्ये शेवटी मानवतेचा संदेश देणारे डॉक्टर सहस्त्रबुद्धे असतात हे सगळे विसरतात. माझ्या पाठीशी उभ्या राहिलेल्या आणि विरोधात बोलणाऱ्यांमध्ये जो फरक आहे, तोच फरक जात आणि जातवर्चस्ववाद्यांमध्ये आहे.
त्यांनी या पोस्ट मध्ये त्यांना पाठिंबा देणाऱ्या, अनिता दाते-केळकर,प्राजक्ता केळकर,श्वेता अंबीकर,शीतल गीते,आणि गौरी सोनार यांचे आभार मानले आहेत. त्यांनी पुढे म्हटलं आहे की, जगात स्त्रीचा सन्मान केला जातो, तो अशाच नितळ निर्मळ आणि पारदर्शी वृत्तीच्या भगिनींमुळे
महत्वाच्या बातम्या
कर्णधारपदाच्या शर्यतीत नव्या खेळाडूची एन्ट्री; म्हणाला, ‘संधी द्या, मी तयार आहे’
चक्क स्वत:च्या ओंजळीने सापाला पाणी पाजतोय हा पठ्ठ्या; व्हिडीओ पाहून तुम्हीही हैराण व्हाल
अजय देवगनच्या मुलीचा ट्रान्सफॉर्मेशन लूक पाहून चाहते हैराण; पहा व्हायरल फोटो