बऱ्याचदा बाॅलीवु़ड कलाकारांना ट्रोलर्सचा सामना करावा लागतो. यावेळी अभिनेता अर्जुन कपुर ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला आहे. सध्या तो फिटनेसवर मेहनत घेताना दिसत आहे. सुरुवातीपासुनच त्याला वाढत्या वजनामुळे ट्रोलर्सचा सामना करावा लागला आहे. त्यात आता पुन्हा एकदा तो ट्रोल झाला आहे. परंतु यावेळी तो ट्रोलर्सवर चांगलाच भडकला आहे. यात त्याच्या गर्लफ्रेंडनेही साथ दिली आहे.
अर्जुनच्या फिटनेस ट्रेनरला एका युजरने मेसेज केला आहे. तो मेसेज अर्जुनने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. तुमच्यासारख्या लोकांसाठी फिटनेस म्हणजे केवळ शेपमध्ये राहणं आणि शरीरयष्टी असणे. तुमच्यासारखी खरी ओळख न दाखवता मागुन वार करणे मला जमत नाही. मी समाेरा -समोर प्रत्येक परिस्थितीला तोंड देतो, असे अर्जुन मेसेज शेअर करताना म्हणाला.
त्याचबरोबर त्याने ई टाइम्सला दिलेल्या मुलाखतीतही यावर प्रतिक्रिया दिली आहे. अशा गोष्टींमधुन त्यांची विचारप्रक्रिया आपल्याला समजते. परंतु या गोष्टींचा माझ्यावर कसलाच परिणाम होत नसुन त्यांच्यावर नक्कीच होतो. जरी ते खोट्या नावांमागे लपले असले तरी त्यांना त्यांचे अस्तित्व माहित आहे. ते खोटे आयुष्य जगत असुन आपल्यातील राग, द्वेष आणि निराशा बाहेर काढण्यासाठी अशा कमेंट्स करत असल्याचा तो म्हणाला.
पुढे तो म्हणाला की, एखाद्या कलाकाराला ट्रोल करणे खुप सोपे असते. जर मी असच कोणाच्या अकाऊंटवर जाऊन केलं असते तर त्याची बातमी झाली असती. त्यामुळे मी किंवा माझ्या कुटुंबीयांबद्दल लिहिण्यापुर्वी हेच जर मी तुमच्याबद्दल आणि तुमच्या आई – बहिणींबद्दल लिहिले असते तर तुम्हाला कसे वाटले असते याचा विचार करा, अशा शब्दात त्याने युजरला सुनावले आहे.
याबाबत मलायकाने त्याला पाठिंबा देण्यासाठी एक पोस्ट शेअर केली आहे. तु अगदी खरे बोलला आहेस. ट्रोलर्सला कधीच डोक्यावर घेऊ नकोस. तुला पुढचा प्रवास सुखकर होण्यासाठी अधिक ताकद मिळो, अशी पोस्ट मलायकाने केली आहे.
त्याच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर त्याचा आगामी चित्रपट ‘कुत्ते’ मधुन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामध्ये तब्बू, नसीरुद्दीन शाह, कोंकना सेन शर्मा आणि राधिका मदन या कलाकारांच्या भूमिका आहेत. त्याचबरोबर, त्याचा एक व्हिलन रिटर्न्स चित्रपटही येणार आहे.