Share

‘ही’ नंबर प्लेट असेल तर कोणत्याच राज्यातील पोलिस तुम्हाला अडवणार नाहीत, वाचा केंद्राच्या नवीन प्रोजेक्टबद्दल..

रस्त्यावर असणाऱ्या वाहनांच्या नंबर प्लेटवरून ते कोणत्या राज्यातील आहेत हे सहज कळू शकते. मात्र, आता लवकरच असा क्रमांक प्रसिद्ध होणार आहे, ज्यावरून गाडीचा नंबर पाहून देखील गाडी कोणत्या राज्य आणि शहराची आहे याची माहिती मिळणार नाही आणि नंबर बदलण्याच्या त्रासातून मुक्तता होणार आहे.

या नंबर प्लेटचे दोन मोठे फायदे सांगितले जात आहेत. एक म्हणजे, नंबर प्लेटवर राज्याचे नाव नसेल तर दुसऱ्या राज्यातील वाहतूक पोलिस अनावधानाने गाडीला थांबणार नाहीत. तसेच दुसरा फायदा म्हणजे, एखाद्याची दुसऱ्या राज्यात बदली झाल्यास त्याला वाहन क्रमांक बदलण्यात कोणतीही अडचण येणार नाही. कारण त्यांचा वाहन क्रमांक इतर राज्यांमध्येही वैध असेल.

माहितीनुसार, भारत सरकारने बीएच म्हणजे भारत सीरीजच्या रजिस्ट्रेशन नंबरकरता पायलट प्रोजेक्ट सुरू केला होता. हा प्रोजेक्ट आता देशभरात नवीन वाहनांना लागू होणार आहे.  याच अंतर्गत वरील गोष्टी लागू होणार आहेत. सरकारने संसदेत याबाबत माहिती जाहिर केली होती. या नंबर प्लेटमुळे वाहन चालकाला खूप मोठा फायदा होणार आहे.

परंतु, बीएच सीरीज नंबर प्लेटमध्ये व्हीआयपी नंबरची सुविधा दिलेली नाही. हा नंबर सामान्य नंबरपेक्षा पूर्णपणे वेगळा असणार आहे. या नंबर प्लेटवर प्रथम चालू वर्षाचे शेवटचे दोन अंक लिहिले जातील आणि नंतर BH लिहिले जाईल. शेवटी चार अंकी क्रमांक लिहिला जाईल. ही एक पांढरी प्लेट असेल ज्यावर काळ्या रंगात अंक लिहिले जाणार आहेत.

बीएच मालिकेसाठी मंत्रालयाने, 10 लाख रुपयांपर्यंतच्या वाहनांसाठी 8 टक्के, 10 ते 20 लाखांपर्यंतच्या वाहनांसाठी 10 टक्के आणि 20 लाखांपेक्षा जास्त किमतीच्या वाहनांसाठी 12 टक्के रस्ता कर निश्चित केला आहे. त्याचबरोबर डिझेलवर चालणाऱ्या वाहनांसाठी दोन टक्के अतिरिक्त शुल्क आकारण्यात येणार असून इलेक्ट्रिक वाहनांवर दोन टक्के कमी कर आकारण्यात येणार आहे.

परिवहन अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, बीएच सीरीजचा क्रमांक जाहीर झाल्यानंतर, त्याचा सर्वाधिक फायदा त्या लोकांना होणार आहे, ज्याचे नोकरीचे ठिकाण सतत बदलत राहते. मात्र या बीएच सुविधांमुळे आता वाहनाचा क्रमांक बदलणे किंवा दुसऱ्या राज्यात जाण्यासाठी पुन्हा नोंदणी करणे यासारख्या त्रासातून त्यांची सुटका होणार आहे.

रस्ते वाहतूक मंत्रालयाने संरक्षण कर्मचारी, केंद्रीय कर्मचारी आणि राज्य सरकारी कर्मचारी आणि सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आणि खाजगी क्षेत्रातील कंपन्या आणि संस्था यांच्या मालकीच्या खाजगी वाहनांच्या नोंदणीसाठी ही नवीन मालिका सुरू केली आहे.

इतर

Join WhatsApp

Join Now