साताऱ्यातील आपशिंगे गावाला आर्मीकडून एक रणगाडा भेट म्हणून देण्यात आल्यामुळे गावकऱ्यांचा आनंद गगनात मावेशासा झाला आहे. या गावाचा नियम आहे की, गावातील प्रत्येक एका घरातील व्यक्तीला सैन्यात भरती करण्यात यावे. गावात 850 कुटूंब असून इथली लोकसंख्या 6 हजाराच्या घरात आहे. त्यानुसार फक्त या गावातील 500 हून अधिक लोक सैन्यात भरती आहे.
देशाच्या रक्षणासाठी गावकऱ्यांनी एवढे मोठे पाऊल उचलल्यामुळे मिलिटरी येथून एक रणगाडा गावकऱ्यांना भेट म्हणून देण्यात आला आहे. गावकऱ्यांनी या रनगाड्याचे अगदी जल्लोषात स्वागत केले आहे. त्यांनी रणगाड्याची तुतारीच्या निनादात भव्य अशी मिरवणूक काढली आहे. तर गावातील महिलांनी रणगाड्याचे हळदी कुंकु लावून पूजन केले आहे.
सांगण्यात येते की, सातारा जिल्ह्यापासून १८ किमी अंतरावर आपशिंगे मिलिटरी गाव आहे. हे गाव छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून सैन्यात असणार गाव आहे. या गावातील सैन्यात भरती होणाऱ्या लोकांची संख्या जास्त असताना सुध्दा गावात मिलिटरी शाळा नाहीत.
या लोकांना शिक्षण घेण्यासाठी पुणे किंवा साताऱ्यात यावे लागते. तरी सुध्दा इथल्या घरातील प्रत्येक एक व्यक्ती सैन्यात भरती झालेला दिसतो. या गावातील घरांमध्ये मुलांना लहानपणापासूनच सैन्यात भरती होण्याचे डोस देण्यात येतात. त्यामुळे पुढे जाऊन मुले सुध्दा शिस्तबध्द होईन व्यवस्थित प्रशिक्षण घेतात.
असे सांगण्यात येते की, पहिल्या महायुध्दात या गावातील तब्बल 46 जवान शहीद झाले होते. या गावातील अनेकांनी युध्दात आपल्या प्राणांची आहुती दिल्यामुळे ब्रिटीशांनी गावाचे नाव आपशिंगे मिलीटरी असे ठेवले. या गावातील अनेकांचे आडनाव निकम आहे. म्हणले जाते की, हे सर्व निकुंभ राजपूत घरण्याचे वारसदार आहेत. असा या गावाचा रंजक इतिहास सर्वत्र प्रसिध्द आहे. आता गावाला रणगाडा भेट देण्यात आल्यामुळे आपशिंगे मिलीटरी गाव चांगलेच चर्चेत आले आहे.