घटस्फोट(Divorce): २००७ साली विवाह झालेल्या जोडप्याचा २०२० मध्ये घटस्फोट झाला. घटस्फोटांनंतर पत्नी तिच्या मित्राबरोबर रिलेशनमध्ये असल्याने पतीने पोटगी देण्यास नकार दिला. सत्र न्यायालयाने सुद्धा पतीच्या या निर्णयाला समर्थन दिले होते. नंतर पत्नीने पती विरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली. उच्च न्यायालयाने पत्नीला दिलासा दिला. न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांनी सांगितले की, पत्नीला तिचे आयुष्य वाटेल तसे जगण्याचा अधिकार आहे. पतीने दरमहा खर्च म्हणून ७५ हजार रुपये व घरभाडे पत्नीला देण्यात यावे.
२०२० मध्ये लग्न होऊन १३ वर्ष झाल्यांनतर पत्नीने पतीच्या कुटूंबीयांविरोधात घरगुती हिंसाचाराची तक्रार दाखल केली. ऑगस्ट २०२१ मध्ये दंडाधिकाऱ्यांनी खटला निकाली लागेपर्यंत आदेश दिला. दरमहा अंतरिम देखभाल म्हणून पत्नीला ७५ हजार रुपये व घरभाडे ३५ हजार रुपये देण्यात यावे. पत्नीचे संबंध मित्रासोबत आहे म्हणून पतीने या निर्णयाविरोधात सत्र न्यायालयात दाद मागितली. २०२१ डिसेंबर सत्र न्यायालयाने पतीला दिलासा देत दंडाधिकाऱ्यांचा हा निर्णय चुकीचा ठरवला. त्यांनतर पत्नीने उच्च न्यायालयात धाव घेतली.
दोघांनीही न्यायालयात आपापल्या बाजू मांडल्या. पत्नीने न्यायालयात सांगितले की, गेले काही वर्ष कुटुंबीयांनी माझा शारीरिक व मानसिक छळ केला. तसेच पतीच्या वडिलांचे प्रसिद्ध हॉटेल आहे. ते चांगली लाइफस्टाइल जगत आहे. त्यामुळे त्यांना पोटगी देणे फारसे कठीण जाणार नाही. पतीने सांगितले की, पत्नीचे मित्रांसोबत रिलेशन आहे. ती नोकरी करते त्याचा सुद्धा तिला ३८ हजार रुपये पगार आहे. तिला कशाला पोटगी द्यायला हवी. या सर्व बाबींवर विचार करून उच्च न्यायालयाने पतीला आदेश दिला की पत्नीला पोटगी देण्यात यावी.
मित्रांसोबत संबंध असल्याचे पत्नीने काबुल केले. सत्र न्यायालयाने हे चुकीचे ठरवून पतीला पोटगी देण्यापासून वाचवले होते. सत्र न्यायालयाने परपुरुषासोबत संबंध असल्याने घरगुती हिंसाचार झालाच नाही असे ठरवले होते. मात्र उच्च न्यायालयाने त्या निर्णयावर विराम दिला व सांगितले की, तिचे आयुष्य कसे जगायचे हा सर्वस्वी तिचा निर्णय आहे. त्यामुळे तिला पोटगी देण्यात यावी.
महत्वाच्या बातम्या
Palghar : एकीकडे स्वातंत्र्यदिन साजरा करत होता देश तर दुसरीकडे जुळ्या बालकांचा झाला मृत्यु
Kaushik lm : चित्रपटसृष्टीवर शोककळा! विजय देवरकोंडा, धनुष, सलमानने जवळचा मित्र गमावला
Movies: तो चित्रपट ज्याने बंगाल दंगलींची करून दिली होती आठवण, पण ‘या’ कारणामुळे झाला बॅन
Nitish Kumar: अमित शहांचा ‘तो’ शेवटचा फोन आणि नितीश कुमारांची अट, नंतर ९ दिवसात झाला राजकीय भूकंप